news
पिंपरी-चिंचवडकरांचा पाणीप्रश्न सुटणार! महापौरांकडून चिखली आणि निगडी प्रकल्पांचे ‘ऑन ग्राऊंड’ इन्स्पेक्शन‘कल्चर क्रेस्ट’मध्ये आता प्रशासक राज! उपनिबंधकांकडून विद्यमान समिती बरखास्त; सभासदांच्या तक्रारीनंतर सहकार विभागाची मोठी कारवाईहक्काचे पाणी हिरावले! एकट्या विधवा महिलेला पाहून देशमुखांची बोअरवेलवर जबरदस्ती; “जे करायचे ते कर” म्हणत दिली जीवे मारण्याची धमकीविचारांच्या लढाईत शस्त्राचे काय काम? दिव्या शिंदे यांच्या ‘त्या’ विधानामुळे कायदेशीर संकट ओढवणार; तरुणाईने सावध राहण्याची गरज“गुन्हेगारी सोडली नाही, तर शहर सोडावे लागेल!”; सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई
Home पिंपरी चिंचवड गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस आयुक्तांचा ‘मास्टरस्ट्रोक’! सराईत गुन्हेगारांची येरवडा आणि नागपूर कारागृहात रवानगी

गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस आयुक्तांचा ‘मास्टरस्ट्रोक’! सराईत गुन्हेगारांची येरवडा आणि नागपूर कारागृहात रवानगी

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडून प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका; २०२६ सालातील पहिली मोठी कारवाई, गुन्हेगारी जगतात उडाली खळबळ. ( © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

दोन धोकादायक गुन्हेगारांची रवानगी थेट तुरुंगात! पोलीस आयुक्तांचा दणका; एमपीडीए (MPDA) कायद्यान्वये केली स्थानबद्धतेची कारवाई

(७ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)


पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दहशत माजवून खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार आणि खंडणीसारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी एमपीडीए (MPDA) कायद्यान्वये कठोर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली असून, परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

या गुन्हेगारांवर झाली कारवाई:

१) रंजीत लक्ष्मण येरकर (वय १९ वर्षे)

  • पत्ता: रा. शहा पेट्रोल पंपाच्या मागे, नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे.

  • गुन्हेगारी पार्श्वभूमी: हा चाकण आणि महाळुंगे एमआयडीसी परिसरात सक्रिय होता. याच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, दुखापत करणे, पळवून नेऊन बलात्कार करणे आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे ३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. याला येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

२) रामदास मारुती साळुंखे (वय ३७ वर्षे)

  • पत्ता: रा. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे.

  • गुन्हेगारी पार्श्वभूमी: हा उत्तर महाळुंगे एमआयडीसी, चाकण, खेड आणि शिक्रापूर परिसरात दहशत माजवत होता. याच्यावर खून, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, खंडणीसाठी अपहरण, तडीपारी आदेशाचा भंग आणि अग्नीशस्त्रे बाळगणे असे तब्बल ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. याची रवानगी नागपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

गुन्हेगारी नियंत्रणासाठी कडक पाऊल

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पदभार स्वीकारल्यापासून गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक धोरण अवलंबले आहे. जानेवारी २०२६ मध्ये ही पहिली दोन मोठी कारवाई असून, मागील २०२५ वर्षात तब्बल ३५ गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. अशा कडक पावलांमुळे भविष्यातील गुन्हेगारी नियंत्रणात येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

यांनी केली ही कामगिरी

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, बसवराज तेली, उपायुक्त श्वेता खेडकर, मारुती जगताप, शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी (महाळुंगे), जितेंद्र कदम (चाकण), रूपाली बोबडे आणि त्यांच्या पथकाने फत्ते केली.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!