news
पिंपळे गुरव प्रभाग २९ मधील स्मशानभूमीत चुकीच्या रचनेमुळे अपघात घडण्याचा धोका; स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांना दिले निवेदनपंढरपूरहून विठुरायाचे दर्शन घेऊन देहूच्या दिशेने निघालेल्या पालखी सोहळ्याचे पिंपरी गावात उत्साहात आगमनतक्रारींची वाट न पाहता अधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी करण्याचे आदेश; रस्ते, पदपथ, रेलिंग व दुभाजकांच्या दुरुस्तीला वेगमुसळधार पावसात कार्यालयात पाणी शिरून कागदपत्रे भिजली; सुरक्षेच्या कारणास्तव दापोडीत तात्पुरते स्थलांतरदि. १६ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या कार्यशाळेत प्रशिक्षणार्थींना मिळाले नाट्यनिर्मिती आणि कॅमेऱ्यासमोरील अभिनयाचे धडे
Home पिंपरी चिंचवड तक्रारींची वाट न पाहता अधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी करण्याचे आदेश; रस्ते, पदपथ, रेलिंग व दुभाजकांच्या दुरुस्तीला वेग

तक्रारींची वाट न पाहता अधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी करण्याचे आदेश; रस्ते, पदपथ, रेलिंग व दुभाजकांच्या दुरुस्तीला वेग

तक्रारींची वाट न पाहता अधिकाऱ्यांनी रस्ते पाहणी करावी; निष्काळजीपणा आढळल्यास कडक कारवाईचा आयुक्त सूर्यवंशींचा इशारा | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवरील खड्डे येत्या दोन दिवसांत बुजवा; महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे कडक निर्देश!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. ९ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते व सार्वजनिक सुविधांची सुरक्षितता आणि देखभाल यांना सर्वोच्च प्राधान्य देत महापालिका प्रशासनाने दुरुस्तीच्या कामांना तीव्र गती दिली आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे येत्या दोन दिवसांत बुजवण्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व तातडीची कार्यवाही करण्याचे कडक निर्देश पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी करून दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना सर्व विभागीय कार्यकारी अभियंते, उपअभियंते व कनिष्ठ अभियंते यांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारींची प्रतीक्षा न करता अधिकाऱ्यांनी स्वतःच्या कार्यक्षेत्राची नियमित पाहणी करून आवश्यक बाबींची नोंद घ्यावी आणि खड्डे बुजविताना कामाचा दर्जा, टिकाऊपणा व सुरक्षिततेची विशेष दक्षता घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

रस्त्यांबरोबरच रस्त्यांवरील रेलिंग, दुभाजकांवरील बॅरिकेड्स, पदपथ तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित इतर सार्वजनिक सुविधांची पाहणी करून दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी क्षेत्रीय कार्यालयानिहाय कामांचे नियोजन करून प्राधान्यक्रम निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रत्येक विभागीय कार्यकारी अभियंता, उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांच्या कार्यक्षेत्रातील रस्ते आणि सार्वजनिक सुविधांच्या देखभालीची जबाबदारी थेट निश्चित करण्यात आली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित कामांमध्ये दिरंगाई किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. सोपविण्यात आलेल्या क्षेत्रातील कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण न झाल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

दुरुस्तीच्या कामांवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त, मुख्य अभियंता आणि सह शहर अभियंता यांनी संबंधित कामांचा नियमित आढावा घ्यावा. खड्डे दुरुस्ती, रेलिंग, दुभाजक आणि पदपथांच्या कामांची क्षेत्रीय कार्यालयनिहाय दररोज प्रगती तपासून त्याचा दैनंदिन अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे.

“नागरिकांना सुरक्षित, सुस्थितीत आणि दर्जेदार रस्ते तसेच सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणे हे महापालिका प्रशासनाचे प्रमुख प्राधान्य आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे, रेलिंग, दुभाजक आणि पदपथांच्या दुरुस्तीची कामे तातडीने व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी तक्रारींची प्रतीक्षा न करता नियमित पाहणी करून कार्यवाही करावी. कामात दिरंगाई आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल.”
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!