news
पिंपळे गुरव प्रभाग २९ मधील स्मशानभूमीत चुकीच्या रचनेमुळे अपघात घडण्याचा धोका; स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांना दिले निवेदनपंढरपूरहून विठुरायाचे दर्शन घेऊन देहूच्या दिशेने निघालेल्या पालखी सोहळ्याचे पिंपरी गावात उत्साहात आगमनतक्रारींची वाट न पाहता अधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी करण्याचे आदेश; रस्ते, पदपथ, रेलिंग व दुभाजकांच्या दुरुस्तीला वेगमुसळधार पावसात कार्यालयात पाणी शिरून कागदपत्रे भिजली; सुरक्षेच्या कारणास्तव दापोडीत तात्पुरते स्थलांतरदि. १६ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या कार्यशाळेत प्रशिक्षणार्थींना मिळाले नाट्यनिर्मिती आणि कॅमेऱ्यासमोरील अभिनयाचे धडे
Home पिंपरी चिंचवड पंढरपूरहून विठुरायाचे दर्शन घेऊन देहूच्या दिशेने निघालेल्या पालखी सोहळ्याचे पिंपरी गावात उत्साहात आगमन

पंढरपूरहून विठुरायाचे दर्शन घेऊन देहूच्या दिशेने निघालेल्या पालखी सोहळ्याचे पिंपरी गावात उत्साहात आगमन

परतीच्या प्रवासातील संत तुकाराम महाराज पालखीचे पिंपरीत आगमन; महापालिकेकडून भव्य स्वागत | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी (परतीचा प्रवास) सोहळ्याचे पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या वतीने भक्तिमय वातावरणात स्वागत!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ९ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज: 

पिंपरी चिंचवड: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन देहूच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघालेल्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे शनिवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले. या पावन पालखी सोहळ्याचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अत्यंत भक्तिमय व उत्साही वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले.
पिंपरी गावातील महात्मा फुले महाविद्यालय चौकात सायंकाळच्या सुमारास जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा पोहोचला. या प्रसंगी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने उपमहापौर शर्मिला बाबर यांनी श्रींच्या पादुकांचे दर्शन घेऊन पालखी सोहळ्याचे अधिकृत स्वागत केले.

या स्वागत सोहळ्याप्रसंगी पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकारी उपस्थित होते. नगरसदस्य संदीप वाघेरे, नगरसदस्या प्रियांका कुदळे, नगरसदस्या निकिता कदम, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसदस्या उषा वाघेरे, गिरिजा कुदळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कनिष्ठ अभियंता बापूसाहेब रोकडे याशिवाय पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विविध अधिकारी, कर्मचारी, वारकरी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखीच्या स्वागतासाठी संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून वारकऱ्यांच्या हरिनामाच्या गजाराने परिसर दुमदुमून गेला होता.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!