news
महापालिकेत विरोधकांचा आवाज बुलंद! सहाव्यांदा निवडून आलेले भाऊसाहेब भोईर ॲक्शन मोडमध्ये; महिला अधिकाऱ्याला धमकी देणाऱ्यांचा शोध घेण्याची मागणीशहराचा कायापालट करण्यासाठी महापौर रवि लांडगे यांचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार; पाणी आणि शास्तीकराच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासनवाहनचालकांनो लक्ष द्या! इंद्रायणीनगर भागात वाहतुकीत फेरबदल; पोलीस भरतीसाठी प्रशासनाची जय्यत तयारीशरद पवार यांची प्रकृती स्थिर; रुबी हॉलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरूपिंपरी-चिंचवडची आरोग्य यंत्रणा होणार हाय-टेक! महापौरांकडून ‘वायसीएम’च्या कामकाजाचे पोस्टमॉर्टम; औषध पुरवठा आणि रुग्णसेवेबाबत सक्त सूचना
Home पिंपरी चिंचवड स्त्रीशक्तीचा अभिमान! तनु भानला पंतप्रधानांच्या हस्ते सुवर्ण पदक; पिंपळे सौदागरच्या शिरपेचात मानाचा तुरा

स्त्रीशक्तीचा अभिमान! तनु भानला पंतप्रधानांच्या हस्ते सुवर्ण पदक; पिंपळे सौदागरच्या शिरपेचात मानाचा तुरा

शत्रुघ्न काटे यांच्याकडून 'बेस्ट कॅडेट' तनुचा गौरव; जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर दिल्ली गाजवून परतलेल्या कन्येवर कौतुकाचा वर्षाव. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपळे सौदागरच्या कन्येचा देशपातळीवर डंका! एनसीसीमध्ये तनु भान ठरली देशातील ‘बेस्ट कॅडेट’; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुवर्णपदकाने सन्मान


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ९ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड : स्त्रीशक्तीचा अभिमान आणि जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्राच्या कन्येने राजधानी दिल्लीत तिरंग्याची मान उंचावली आहे. प्रजासत्ताक दिन संचलनानंतर दिल्लीतील करिअप्पा परेड ग्राऊंडवर पार पडलेल्या एनसीसी रॅलीमध्ये, पिंपळे सौदागर येथील रहिवासी आणि महाराष्ट्र संचालनालयाची ज्युनिअर अंडर ऑफिसर तनु भान हिने आर्मी विंगमधून देशातील सर्वोच्च ‘बेस्ट कॅडेट’ हा मानाचा किताब पटकावला.

एका दिमाखदार सोहळ्यात भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते तनु भान हिला सुवर्ण पदक आणि मानाची ‘केन’ देऊन गौरविण्यात आले. शिस्त, नेतृत्व, शारीरिक क्षमता, आत्मविश्वास आणि राष्ट्रसेवेची ओढ या सर्व निकषांवर तनुने देशातील इतर कॅडेट्सना मागे टाकत हे यश संपादन केले.

तनु भान हिच्या या ऐतिहासिक यशामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाचा गौरव करण्यासाठी पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांनी तनुच्या निवासस्थानी जाऊन तिची व तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि तिचा विशेष सन्मान केला.

याप्रसंगी बोलताना शत्रुघ्न काटे म्हणाले की, “तनु भान ही पिंपळे सौदागरची कन्या असल्याने तिने केवळ आपल्या भागाचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावली आहे. तिचे यश हे महिलाशक्तीचे तेजस्वी उदाहरण असून, शिस्त आणि परिश्रमाच्या बळावर मुली कोणतेही शिखर सर करू शकतात, हा संदेश तिने देशाला दिला आहे. तिची ही यशोगाथा शहरातील हजारो तरुणींसाठी प्रेरणादायी ठरेल.”

या सन्मान सोहळ्याप्रसंगी श्री. विनोद पाटील, तनु भान यांचे कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रसेवेच्या क्षेत्रात मुली कुठेही कमी नाहीत, हे तनुने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले असून, तिच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!