‘स्वच्छतेच्या महामेरू’चा चिंचवडमध्ये जागर! राष्ट्रसंत गाडगेबाबांची १५० वी जयंती उत्साहात; ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २४ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : “हातत झाडू आणि मुखी गोपालाचा गजर करत अंधश्रद्धा व अस्वच्छतेच्या विळख्यातून समाजाला मुक्त करणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा हे खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे स्वच्छता दूत होते,” अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव चिंचवड येथे करण्यात आला. महाराष्ट्र राज्य धोबी विकास महासंघ आणि समस्त धोबी समाज, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने संत गाडगेबाबांची १५० वी जयंती चिंचवडमधील आनंदीबाई डोके सांस्कृतिक सभागृहात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात पहाटेच्या प्रसन्न वातावरणात भजनाने करण्यात आली. त्यानंतर गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. केवळ उत्सव न साजरा करता बाबांच्या ‘जनसेवा’ या संदेशाला जागत ठेवून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ५१ तरुण व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
पिंपरी-चिंचवड शहर लॉन्ड्री संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई विशाल जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.
संत गाडगेबाबा (१८७६-१९५६) यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजप्रबोधनासाठी वेचले. त्यांच्या कार्याचे काही महत्त्वाचे पैलू:
-
स्वच्छता हीच सेवा: गाडगेबाबांनी तीर्थक्षेत्री जाऊन केवळ उपदेश दिले नाहीत, तर स्वतः हातात झाडू घेऊन गावे स्वच्छ केली. “देव देव्हाऱ्यात नसून तो माणसांत आहे,” हा विचार त्यांनी रूजवला.
-
शिक्षण व दशसूत्री: त्यांनी शाळा, धर्मशाळा आणि अनाथालये बांधण्यावर भर दिला. गरिबांचे शिक्षण, भुकेल्यांना अन्न आणि पीडितांची सेवा हीच खरी भक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.
-
अंधश्रद्धा निर्मूलन: कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अनिष्ट प्रथा, हुंडाबळी आणि व्यसनाधीनतेवर प्रहार केले.
या भव्य सोहळ्याचे नियोजन संतोष मनोहर सिरसाट, सचिन दत्तात्रय सिरसाट, शिवाजी ठाकरे, रवींद्र ठाकरे, आकाश जवळकर, कैलास जाधव, रविकुमार पैठणकर, अमोल मोरे, विनोद ठाकरे आणि अनंता जाधव यांनी केले. या सोहळ्यासाठी अभिषेक ठाकरे, संतोष गोतावळे यांच्यासह संजय सिरसाट, राजू सिरसाट, सागर उद्रकर, संजय नवले, बजरंग जवळकर, उमेश सिरसाट, विलास व्यवहारे, कल्याण व्यवहारे, माऊली वाघमारे, किशोर व्यवहारे, अशोक उबाळे, गजानन जाधव, संदीप सिरसाट, दिंगबर सिरसाट, आशिष जवळकर, अविनाश जवळकर, गणेश जाधव, हर्षल सिरसाट, विठ्ठल सिरसाट, राहुल सिरसाट, आकाश उद्रकर, रवी मोरे, परमेश्वर पैठणकर, राहुल हिवाळे, रामेश्वर पैठणकर, राम वाघमारे, तन्मय सिरसाट, सक्षम सिरसाट, विष्णू खंडागळे, योगेश घोडके, राहुल नवले, आदित्य जवळकर, शुभम नवले, अभिषेक मोरे, दीपक काळे, आकाश ठाकरे, आकाश शिरसाट, रोहित शिरसाट, विजय डोंगरे, गणेश व्यवहारे, संतोष व्यवहारे, प्रज्वल व्यवहारे, सागर राऊत, गजानन राऊत, शुभम उद्रकर, दर्शन राऊत, स्वप्नील इंगोले आणि अंकुश शिरसाट या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


