news
पूरणनगरमध्ये वाळलेल्या झाडांमुळे मृत्यूची टांगती तलवार; वारंवार तक्रार करूनही मनपा उद्यान विभागाचे ‘डोळेझाक’!पिंपळे सौदागरच्या लिनिअर गार्डनमध्ये रंगला भक्ती आणि योगाचा अनोखा संगम! ‘द आर्ट ऑफ लिविंग’ आणि भाजपचा संयुक्त उपक्रमरहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेत
Home पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या १० व्यक्तींना ‘पिंपरी चिंचवड सन्मान’! ‘सुलतान’ लघुपटाचे रंगणार विशेष स्क्रीनिंग; दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा रंगणार

शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या १० व्यक्तींना ‘पिंपरी चिंचवड सन्मान’! ‘सुलतान’ लघुपटाचे रंगणार विशेष स्क्रीनिंग; दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा रंगणार

खासदार श्रीरंग आप्पा बारणे अन् आमदार महेश लांडगे यांची प्रमुख उपस्थिती; साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस भूषवणार अध्यक्षपद, अविनाश कांबीकर यांच्या 'न्यूज १४ मीडिया'चा उपक्रम

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी चिंचवड सन्मान – २०२६’ चे मानकरी जाहीर! सायन्स पार्कमध्ये रंगणार दिमाखदार सोहळा; विविध क्षेत्रांतील १० दिग्गजांचा होणार गौरव (०३ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी आयोजित तिसऱ्या “पिंपरी चिंचवड सन्मान – २०२६” चे मानकरी जाहीर झाले आहेत. समाजजीवन, कला, साहित्य, क्रीडा आणि कृषी अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या १० व्यक्तींना यंदा या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

हा सोहळा शनिवार, दि. ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता चिंचवड येथील सायन्स पार्क (तारांगण सभागृह) येथे पार पडणार असल्याची माहिती ‘News14 Media Network’ चे संपादक अविनाश कांबीकर यांनी दिली आहे. यंदाच्या निवड समितीने शहरातील खालील मान्यवरांची पुरस्कारासाठी निवड केली आहे:

  • अथर्व अभय कुलकर्णी (कला व संगीत)

  • अरुण पुराणिक (पर्यावरण संवर्धन)

  • डॉ. राजेंद्र काकंरिया (साहित्य व शिक्षण)

  • अनिल मित्तल (उद्योग व सामाजिक कार्य)

  • संतोष खवळे (कृषी)

  • कृष्णा ढोकले (गिर्यारोहण व साहसी क्रीडा)

  • श्लोक ताम्हाणे (कुस्ती – राज्यस्तरीय कांस्य पदक विजेता)

  • श्रीकांत चौगुले (निवेदन व लेखन)

  • पांडुरंग वाघमारे (शैक्षणिक कार्य)

  • प्रद्योत पेंढारकर (सांस्कृतिक व चित्रपट विषयक क्षेत्र)

शहराला सात वर्षांनंतर लोकनियुक्त प्रतिनिधी लाभल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर, या सोहळ्यात नवनियुक्त महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे आणि स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अण्णासाहेब बनसोडे, अमित गोरखे, उमाताई खापरे, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कथेवर आधारित आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त “सुलतान” या लघुपटाचे माध्यम प्रतिनिधींसाठी विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. दिग्दर्शक अविनाश किसनराव कांबीकर यांच्याशी संवाद साधण्याची संधीही यावेळी पत्रकारांना मिळणार आहे.

शहरातील नागरिकांनी या दिमाखदार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!