news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड कामगारांच्या आयुष्यात सुवर्णक्षण! महिंद्रा लॉजिस्टिकमध्ये पगारवाढीचा ‘धडाका’; साडेतीन वर्षांच्या करारावर शिक्कामोर्तब, बोनस आणि लाभांचा वर्षाव

कामगारांच्या आयुष्यात सुवर्णक्षण! महिंद्रा लॉजिस्टिकमध्ये पगारवाढीचा ‘धडाका’; साडेतीन वर्षांच्या करारावर शिक्कामोर्तब, बोनस आणि लाभांचा वर्षाव

लॉजिस्टिक क्षेत्रातील ऐतिहासिक करार; ३६६ कामगारांच्या पगारात मोठी वाढ अन् ५ लाखांच्या विम्याचे कवच, 'स्वाभिमानी श्रमिक' संघटनेच्या लढ्याला मोठे यश. (०३ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

चाकणच्या औद्योगिक पट्ट्यात फटाक्यांची आतषबाजी! महिंद्रा लॉजिस्टिकमध्ये १५,५०० रुपयांची विक्रमी वेतनवाढ; आमदार महेश लांडगे यांच्या मध्यस्थीला यश


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले

चाकण/निघोजे : लॉजिस्टिक क्षेत्रातील कामगारांच्या आयुष्यात सुवर्णक्षण आणणारा ऐतिहासिक वेतनवाढ करार ‘महिंद्रा लॉजिस्टिक लि.’ आणि ‘स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना’ यांच्यात संपन्न झाला आहे. आमदार महेश लांडगे यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे कामगारांना तब्बल १५,५०० रुपयांची (CTC) भरघोस पगारवाढ मिळाली असून, लॉजिस्टिक उद्योगातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रमी करार ठरला आहे.

निघोजे येथील कंपनी कार्यालयात हा करार औपचारिक करण्यात आला. करार जाहीर होताच कामगारांनी पेढे वाटून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा केला. साडेतीन वर्षांच्या (०१/०३/२०२६ ते ३१/०८/२०२९) या करारात कामगारांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत:

  • वेतनवाढ: एकूण १५,५०० रुपये (३०:३०:४० या प्रमाणात विभागणी).

  • बोनस: २०२४-२५ सालासाठी ३९,२०० रुपये, तर पुढील काळात हा बोनस ४३,८०० ते ५९,१०० रुपयांपर्यंत वाढणार.

  • विमा सुरक्षा: ५ लाख रुपयांची ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी आणि ५ लाख रुपयांची ग्रुप टर्म इन्शुरन्स पॉलिसी.

  • रजा आणि उचल: ३६६ कामगारांच्या रजेत ३ दिवसांची वाढ. तसेच वैद्यकीय कारणांसाठी ग्रॉस पगाराच्या तीनपट उचल (Advance) मंजूर.

  • विशेष बक्षीस: करार वेळेत पूर्ण झाल्याबद्दल प्रत्येक कामगाराला ७,५०० रुपयांचे विशेष बक्षीस.

या करार सोहळ्याला संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार महेश लांडगे, मार्गदर्शक रोहिदास गाडे, अध्यक्ष जीवन येळवंडे उपस्थित होते. कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट (HR) संजय गावडे, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट प्रदीप झोटिंग, धीरज सिंह, निंबा भांबरे, नामदेव टाचतोडे आणि राहुल भागवत यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

“महिंद्रा लॉजिस्टिकमधील कामगार हे उद्योगाचा आत्मा आहेत. या कराराद्वारे आम्ही केवळ पगारवाढ दिली नाही, तर त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणली आहे. रजा, बोनस, आरोग्य सुरक्षा आणि उत्पादन वृद्धी या सर्व बाबींचा विचार करून हा करार करण्यात आला आहे. कामगार जेवढे सुरक्षित आणि संतुष्ट असतील, तितकीच कंपनी प्रगती करेल. हा करार लॉजिस्टिक क्षेत्रात एक आदर्श उदाहरण बनेल.” — महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा.

या करारामुळे चाकण औद्योगिक वसाहतीतील इतर कंपन्यांमध्येही सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, कामगारांच्या हक्कांना बळ देणारा हा एक मजबूत दाखला ठरला आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!