news
सीआयआरटी (CIRT), ऑटोसिफू आणि जगमंगल सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी प्रिन्सिपल्स मीट २०२६’ चे ऑनलाइन उद्घाटन२० वर्षांच्या निष्ठावंत सेवेनंतर ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू लोडम यांचा पक्षत्याग; मूर्तिजापूरसह अकोला जिल्ह्यात पक्षाची मोठी हानी होण्याची शक्यतानागपुरात महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून यात्रेचा प्रारंभ; ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आक्रमकपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे ‘सिटी प्राईड SCHOOL’च्या विद्यार्थ्यांसाठी जनजागृती अभियान; उपकरणांची माहिती व प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधीकर्मचारी महासंघाच्या प्रलंबित प्रश्नांवर आयुक्त कार्यालयात उच्चस्तरीय आढावा बैठक; पदोन्नती, सेवा ज्येष्ठता, जुनी पेन्शन आणि बोनस कराराबाबत महत्त्वपूर्ण चर्चा
Home पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या प्रलंबित प्रश्नांवर आयुक्त कार्यालयात उच्चस्तरीय आढावा बैठक; पदोन्नती, सेवा ज्येष्ठता, जुनी पेन्शन आणि बोनस कराराबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

कर्मचारी महासंघाच्या प्रलंबित प्रश्नांवर आयुक्त कार्यालयात उच्चस्तरीय आढावा बैठक; पदोन्नती, सेवा ज्येष्ठता, जुनी पेन्शन आणि बोनस कराराबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

कर्मचारी महासंघाच्या प्रलंबित प्रश्नांवर महापालिकेत आढावा बैठक; पदोन्नती, पेन्शन अन् बोनस करारावर तात्काळ कार्यवाहीचे आदेश | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन सकारात्मक; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे महत्त्वाचे निर्देश!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ७ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सेवाविषयक प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी महापालिका प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांची टप्प्याटप्प्याने पूर्तता करण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी आवश्यक कार्यवाही अधिक गतिमान करावी, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या विविध मागण्यांसंदर्भात महापालिकेच्या कामगार कल्याण विभागाच्या वतीने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त कार्यालयात विशेष आढावा बैठक पार पडली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या हिताच्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांशी निगडित प्रमुख विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.  कर्मचाऱ्यांच्या वेळेत पदोन्नती आणि सेवा ज्येष्ठतेच्या याद्या अद्ययावत करणे.  जुनी पेन्शन योजना, आश्वासित प्रगती योजना (१०, २० व ३० वर्षांचा लाभ) आणि आगाऊ वेतनवाढ. सेवा प्रवेश नियम, आकृतीबंध, धन्वंतरी योजना तसेच घरबांधणी कर्ज, वाहन कर्ज व संगणक कर्जाचे वितरण. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसबाबतचा करार लवकरात लवकर पूर्ण करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी बोलताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले:
“महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक प्रश्न नियमांच्या चौकटीत राहून आणि वेळेत निकाली काढण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही केली जात आहे. महापालिका महासंघाने मांडलेल्या प्रत्येक मागणीचा वस्तुनिष्ठ विचार करून ज्या बाबींवर तत्काळ निर्णय घेणे शक्य आहे, त्या प्रकरणांमध्ये कोणतीही दप्तरदीरंगाई केली जाणार नाही. संबंधित विभागांनी आवश्यक ते सर्व प्रस्ताव आणि कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कर्मचारी हिताचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत.”

या उच्चस्तरीय बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, सह-आयुक्त मनोज लोणकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, उप-आयुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत, सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्यासह महासंघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!