news
सीआयआरटी (CIRT), ऑटोसिफू आणि जगमंगल सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी प्रिन्सिपल्स मीट २०२६’ चे ऑनलाइन उद्घाटन२० वर्षांच्या निष्ठावंत सेवेनंतर ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू लोडम यांचा पक्षत्याग; मूर्तिजापूरसह अकोला जिल्ह्यात पक्षाची मोठी हानी होण्याची शक्यतानागपुरात महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून यात्रेचा प्रारंभ; ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आक्रमकपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे ‘सिटी प्राईड SCHOOL’च्या विद्यार्थ्यांसाठी जनजागृती अभियान; उपकरणांची माहिती व प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधीकर्मचारी महासंघाच्या प्रलंबित प्रश्नांवर आयुक्त कार्यालयात उच्चस्तरीय आढावा बैठक; पदोन्नती, सेवा ज्येष्ठता, जुनी पेन्शन आणि बोनस कराराबाबत महत्त्वपूर्ण चर्चा
Home मुख्यपृष्ठ २० वर्षांच्या निष्ठावंत सेवेनंतर ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू लोडम यांचा पक्षत्याग; मूर्तिजापूरसह अकोला जिल्ह्यात पक्षाची मोठी हानी होण्याची शक्यता

२० वर्षांच्या निष्ठावंत सेवेनंतर ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू लोडम यांचा पक्षत्याग; मूर्तिजापूरसह अकोला जिल्ह्यात पक्षाची मोठी हानी होण्याची शक्यता

२० वर्षांच्या सेवेनंतर विष्णू लोडम यांचा पक्षत्याग; मूर्तिजापूरसह अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मूर्तिजापुरात मोठा धक्का; निष्ठावंत नेतृत्व विष्णू लोडम यांचा पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा!

मूर्तिजापूर/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. ७ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अकोला: अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील प्रसिद्ध समाजसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे ओबीसी विभाग जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू लोडम यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आपल्या जिल्हा कार्याध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. गेल्या तब्बल २० वर्षांपासून पक्षाचे निष्ठावंत आणि खंदे कार्यकर्ते म्हणून कार्यरत असलेल्या लोडम यांच्या अचानक राजीनाम्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला असून अकोला जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे.

विष्णू लोडम यांनी आपल्या दीर्घ राजकीय प्रवासात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रामाणिकपणे जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांनी पक्षाचे प्राथमिक सदस्य, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष तसेच विधानसभा निरीक्षक अशा विविध महत्त्वपूर्ण पदांवर यशस्वीपणे काम केले होते.
केवळ राजकीयच नव्हे, तर मूर्तिजापूर शहर व तालुक्यात आपल्या मृदू स्वभाव, अभ्यासू वृत्ती आणि तत्पर सामाजिक कार्यामुळे त्यांनी नागरिकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या आयोजन व नियोजनात त्यांचा सक्रिय व अत्यंत महत्त्वाचा सहभाग राहिला होता. प्रत्येक पक्षीय उपक्रम यशस्वी करण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा.

विष्णू लोडम यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मूर्तिजापूर आणि अकोला जिल्ह्यातील संघटन खिळखिळे होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. लोडम यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाचा एक अत्यंत मजबूत ओबीसी चेहरा दुरावला आहे, ज्याचा थेट फटका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बसू शकतो.  लोडम यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे आणि वैयक्तिक संपर्कामुळे तालुक्यातील शेकडो तरुण व ज्येष्ठ कार्यकर्ते पक्षाशी जोडले गेले होते. त्यांच्या पक्षत्यागामुळे अनेक कार्यकर्त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून पक्षात मोठे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकांचे अचूक नियोजन आणि तळागाळातील संपर्क यंत्रणा सांभाळणारा अनुभवी नेता गमावल्यामुळे पक्षाची मोठी राजकीय हानी मानली जात आहे.

 

विष्णू लोडम यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून, ते पुढे काय भूमिका घेतात? कोणत्याही दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात की स्वतंत्र सामाजिक मार्ग निवडतात? याकडे आता संपूर्ण मूर्तिजापूर आणि अकोला जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!