news
सीआयआरटी (CIRT), ऑटोसिफू प्रा. लि. आणि जगमंगल सोशल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी प्रिन्सिपल्स मीट २०२६’ संपन्नपोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते फीत कापून व फलकाचे अनावरण करून कार्यालयाचा शुभारंभ; नागरिकांना अधिक सुलभ व गतिमान सेवा देण्याचे निर्देशसीआयआरटी (CIRT), ऑटोसिफू आणि जगमंगल सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी प्रिन्सिपल्स मीट २०२६’ चे ऑनलाइन उद्घाटन२० वर्षांच्या निष्ठावंत सेवेनंतर ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू लोडम यांचा पक्षत्याग; मूर्तिजापूरसह अकोला जिल्ह्यात पक्षाची मोठी हानी होण्याची शक्यतानागपुरात महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून यात्रेचा प्रारंभ; ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आक्रमक
Home पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते फीत कापून व फलकाचे अनावरण करून कार्यालयाचा शुभारंभ; नागरिकांना अधिक सुलभ व गतिमान सेवा देण्याचे निर्देश

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते फीत कापून व फलकाचे अनावरण करून कार्यालयाचा शुभारंभ; नागरिकांना अधिक सुलभ व गतिमान सेवा देण्याचे निर्देश

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते सांगवी विभाग कार्यालयाचा शुभारंभ; नागरिकांना सुलभ सेवा देण्याचे निर्देश | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड पोलिसांचे महत्त्वाचे पाऊल; सहायक पोलीस आयुक्त ‘सांगवी विभाग’ नवीन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ८ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत सांगवी विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ घडवून आणण्यासाठी आणि नागरिकांना अधिक प्रभावी कायदा व सुव्यवस्था सेवा पुरवण्यासाठी नवीन सहायक पोलीस आयुक्त (ACP) सांगवी विभाग कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. या नवीन कार्यालयाचा भव्य उद्घाटन समारंभ पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या शुभहस्ते फीत कापून व नामाभिधान फलकाचे अनावरण करून अत्यंत उत्साहात पार पडला.
या प्रसंगी बोलताना पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी नवीन कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी पूर्ण कार्यक्षमतेने आणि समर्पित भावनेने कार्य करावे, असे स्पष्ट निर्देश दिले. अद्ययावत सुविधा, सुबक कार्यालयीन वातावरण आणि आधुनिक कार्यप्रणालीमुळे नागरिकाभिमुख सेवा अधिक प्रभावी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या उद्घाटन सोहळ्यास पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती लाभली होती. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह-आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) डॉ. बसवराज तेली, पोलीस उपायुक्त संदीप आटोळे (परि-१), रोहिदास पवार (गुन्हे शाखा), प्रदीप जाधव (परि-२), मारुती जगताप (परि-३), विक्रांत देशमुख (वाहतूक शाखा), धीरज पाटील (विशेष शाखा), सहायक पोलीस आयुक्त मनीषा कदम (सांगवी विभाग), प्रशांत ढोले (पिंपरी विभाग) याशिवाय परिमंडळ-१ मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि सांगवी विभागातील कार्यालयीन कर्मचारी वर्ग या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होता.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!