news
पिंपळे गुरव प्रभाग २९ मधील स्मशानभूमीत चुकीच्या रचनेमुळे अपघात घडण्याचा धोका; स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांना दिले निवेदनपंढरपूरहून विठुरायाचे दर्शन घेऊन देहूच्या दिशेने निघालेल्या पालखी सोहळ्याचे पिंपरी गावात उत्साहात आगमनतक्रारींची वाट न पाहता अधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी करण्याचे आदेश; रस्ते, पदपथ, रेलिंग व दुभाजकांच्या दुरुस्तीला वेगमुसळधार पावसात कार्यालयात पाणी शिरून कागदपत्रे भिजली; सुरक्षेच्या कारणास्तव दापोडीत तात्पुरते स्थलांतरदि. १६ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या कार्यशाळेत प्रशिक्षणार्थींना मिळाले नाट्यनिर्मिती आणि कॅमेऱ्यासमोरील अभिनयाचे धडे
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून दरवर्षी करोडो रुपयांचा निधी मिळूनही PMPML कडून सोयी-सुविधांचा बोजवारा; मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत हिंगे यांना पाठवले अंतिम पत्र

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून दरवर्षी करोडो रुपयांचा निधी मिळूनही PMPML कडून सोयी-सुविधांचा बोजवारा; मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत हिंगे यांना पाठवले अंतिम पत्र

PMPML च्या निष्क्रीयतेविरोधात प्रदीप गायकवाड आक्रमक; मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत हिंगे यांना पाठवले अंतिम पत्र | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

कासारवाडी नाशिक फाटा येथे PMPML बसशेडचा अभाव; उन्हापावसात प्रवाशांचे हाल, राष्ट्रवादी अर्बन सेलचे प्रदीप गायकवाड यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ९ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील कासारवाडी येथील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या नाशिक फाटा परिसरात ‘पीएमपीएमएल’ (PMPML) चा सुसज्ज बसथांबा (बसशेड) नसल्यामुळे प्रवाशांना भर उन्हात आणि मुसळधार पावसात उघड्यावर ताटकळत उभे राहावे लागत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका दरवर्षी PMPML ला कोट्यवधी रुपयांचा निधी देते, मात्र त्या बदल्यात नागरिकांना साध्या मूलभूत सोयी-सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (कै. अजितदादा पवार) अर्बन सेलचे शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी PMPML चे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत हिंगे यांना पत्र लिहून निष्क्रीय कारभारावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

PMPML चे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत हिंगे यांना पाठवलेल्या पत्रात प्रदीप गायकवाड यांनी अत्यंत कडक शब्दांत प्रशासनाचा निषेध केला आहे. पत्रात त्यांनी नमूद केले की:
“हिंगेसाहेब! सदर ठिकाणचे छायाचित्र तुम्हाला पाठवताना लाज वाटत होती आणि प्रचंड चीडही येत होती. गेल्या कित्येक वर्षांपासून कासारवाडी व निगडी परिसरातील प्रवासी थांब्याविना उन्हापावसात वैतागलेल्या अवस्थेत बसची वाट पाहत उभे असतात. वर्तमानपत्रे, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक आणि आमदारांनी वारंवार मागणी करूनही तुमच्या विभागावर त्याचा काडीचाही परिणाम झाला नाही, हे दुर्दैव आहे.”

परवा झालेल्या मुसळधार पावसात सर्व वयोगटातील प्रवाशांना, महिलांना आणि वृद्धांना आडोशासाठी जीव मुठीत धरून पळताना पाहून अत्यंत वाईट वाटले. त्यामुळे आता हे तुम्हाला दिलेले अंतिम पत्र आहे.

शहरात अनेक ठिकाणी बसथांबे नसल्याने प्रवाशांनी दाद कोणाकडे मागायची, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या या बेफिकीर आणि निष्क्रीय वृत्तीमुळे प्रवाशांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.
प्रदीप गायकवाड यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, या संदर्भात लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री. योगेशभाई बहल यांच्याशी सविस्तर चर्चा करून कासारवाडी नाशिक फाटा येथे PMPML प्रशासनाविरोधात तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!