news
सीआयआरटी (CIRT), ऑटोसिफू आणि जगमंगल सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी प्रिन्सिपल्स मीट २०२६’ चे ऑनलाइन उद्घाटन२० वर्षांच्या निष्ठावंत सेवेनंतर ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू लोडम यांचा पक्षत्याग; मूर्तिजापूरसह अकोला जिल्ह्यात पक्षाची मोठी हानी होण्याची शक्यतानागपुरात महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून यात्रेचा प्रारंभ; ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आक्रमकपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे ‘सिटी प्राईड SCHOOL’च्या विद्यार्थ्यांसाठी जनजागृती अभियान; उपकरणांची माहिती व प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधीकर्मचारी महासंघाच्या प्रलंबित प्रश्नांवर आयुक्त कार्यालयात उच्चस्तरीय आढावा बैठक; पदोन्नती, सेवा ज्येष्ठता, जुनी पेन्शन आणि बोनस कराराबाबत महत्त्वपूर्ण चर्चा
Home पिंपरी चिंचवड नागपुरात महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून यात्रेचा प्रारंभ; ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आक्रमक

नागपुरात महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून यात्रेचा प्रारंभ; ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आक्रमक

महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून 'मंडल यात्रा' सुरू; काँग्रेस नेत्यांचा नागपुरातून एल्गार | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी काँग्रेसचे नागपुरातून रणशिंग! मंडल दिनानिमित्त ‘मंडल यात्रा’ंचा शुभारंभ  

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ७ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज: 

पिंपरी चिंचवड: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने ७ ऑगस्ट या ‘मंडल दिना’चे औचित्य साधून ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आणि ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी या मुख्य मागणीसाठी राज्यव्यापी ‘मंडल यात्रा’चे आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक ‘मंडल यात्रा’चा शुभारंभ आज नागपूर येथून अत्यंत उत्साहात आणि भव्य शक्तिप्रदर्शनाने करण्यात आला.
या यात्रेची सुरुवात नागपूर येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत करण्यात आली.

केंद्र व राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे सातत्याने केलेल्या दुर्लक्षाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेसच्या ओबीसी विभागाने या यात्रेचे नियोजन केले आहे. ओबीसींची जातनिहाय जनगणना झाल्यासच समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य न्याय आणि हक्क मिळू शकतील, अशी ठाम भूमिका याप्रसंगी काँग्रेस नेत्यांनी मांडली.

नागपूर येथून निघालेल्या या ‘मंडल यात्रे’मध्ये काँग्रेस पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी आणि ओबीसी विभागाचे राज्यभरातील महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या प्रसंगी प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अजय हटेवार, नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल गुडधे पाटील, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बैस, माजी मंत्री सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गिरीशभाऊ पांडव, मंडल यात्रा संयोजक मोरेश्वर भादे, प्रदेश उपाध्यक्ष संजय भिलकर, अवंतिकाताई लेकुरवाळे, भूषण तेल्हार, शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांच्यासह काँग्रेस पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यात्रेच्या माध्यमातून आगामी काळात राज्यभर ओबीसी हक्कांची मोठी जनजागृती केली जाणार आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!