पिंपरी-चिंचवडमध्ये ३०० परिचारिकांसाठी ‘कौशल्य वृद्धी’ कार्यशाळा संपन्न! महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन; नर्सिंग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर मंथन
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, ०९ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका नर्सेस असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या निरंतर व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत (CNE) एक दिवसीय भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. “परिचर्या व्यवसायातील कौशल्य वृद्धी आणि तांत्रिक ज्ञान अद्ययावत करणे” या उद्देशाने आयोजित या कार्यशाळेत महापालिकेच्या विविध रुग्णालयांतील ३०० हून अधिक परिचारिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या कार्यशाळेचे उद्घाटन पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनची प्रेरणा आणि पीसीएमसी कर्मचारी महासंघाच्या सहकार्याने ही कार्यशाळा यशस्वी झाली. यावेळी मंचावर पी.जी.आय. वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उज्वला अंदुरकर, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. मनिषा सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच वायसीएम रुग्णालयाच्या मुख्य मेट्रन वत्सला वाजे, स्वाती कुलकर्णी (असि. मेट्रन), आणि भोसरी रुग्णालयाच्या वंदना दिवेकर (असि. मेट्रन) यांनीही उपस्थित राहून परिचारिकांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत तांत्रिक विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी ससून रुग्णालयाच्या मेट्रन विमल केदारी, अपर्णा नाईक, डॉ. शीतल पिंपळकर, डॉ. मंगेश जबडे आणि कु. पायल भगत यांनी ‘स्पीकर’ म्हणून काम पाहिले. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या वतीने निरीक्षक (Observer) म्हणून शर्मिला कुल्लाळ यांनी कामकाजाचे परीक्षण केले.
असोसिएशनच्या अध्यक्षा सविता निगडे आणि उपाध्यक्ष वर्षा जानराव यांनी कार्यशाळेचे मुख्य आयोजक (Organizer) म्हणून धुरा सांभाळली. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष मेषा मुर्वे, सरचिटणीस विजया रोडे, खजिनदार राजश्री गिते, सहचिटणीस शोभा भारती, बनिता गावडे, शारदा मुंडे, शोभा डोले आणि संघटक सचिव सुवर्णा नाझरेकर यांसह सर्व कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या प्रशिक्षणामुळे परिचारिकांच्या कामकाजात आधुनिकता येईल आणि रुग्णांना अधिक दर्जेदार सेवा मिळेल, असा विश्वास असोसिएशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


