news
दिल्ली मेट्रो, नाशिक कुंभमेळा जलसुविधा प्रकल्पासह ऊर्जा आणि सौर क्षेत्रातील मोठ्या ऑर्डर्स प्राप्त; कंपनीची व्यवसायात सातत्यपूर्ण घोडदौडशहराच्या पाणीपुरवठ्याला बाधा न आणता प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर संवेदनशीलतेने टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्याचे महापौरांचे आश्वासनपोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या अध्यक्षतेखाली मर्सिडीज कंपनीत उद्योजक व पोलीस विभागाचे भव्य समन्वय चर्चासत्रकृत्रिम फ्लेव्हर्सचा (Artificial Flavours) वापर ठरला कारण; अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याने अन्न सुरक्षा प्राधिकरणाची धडक कारवाईपत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा भाग दान करत वाचवला पतीचा जीव; तब्बल २१ लाख ६० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य
Home पिंपरी चिंचवड प्रामाणिक रिक्षा चालकांना मिळणार दिलासा! परवान्यांच्या सुळसुळाटामुळे उत्पन्नावर झाला होता परिणाम; काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखालील संघर्षाला यश

प्रामाणिक रिक्षा चालकांना मिळणार दिलासा! परवान्यांच्या सुळसुळाटामुळे उत्पन्नावर झाला होता परिणाम; काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखालील संघर्षाला यश

२०१७ पासूनच्या 'मुक्त परवाना' धोरणाला ब्रेक! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा ९ मार्चपासूनचा मोठा निर्णय; वाहतूक कोंडी अन् प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी उचलले पाऊल. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

रिक्षा चालकांच्या लढ्याला मोठे यश! नवीन रिक्षा परवान्यांना राज्यात स्थगिती; पिंपरीत कष्टकरी रिक्षा-टॅक्सी महासंघातर्फे निर्णयाचे स्वागत


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ०९ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : महाराष्ट्र राज्यातील रिक्षा चालकांसाठी २०१७ पासून सुरू असलेल्या ‘मुक्त परवाना’ धोरणामुळे रिक्षांची संख्या प्रचंड वाढली होती. याचा परिणाम वाहतूक कोंडी, वाढते प्रदूषण आणि खऱ्या रिक्षा चालकांच्या उत्पन्नावर होत होता. या पार्श्वभूमीवर, रिक्षा चालक संघटनांनी केलेल्या दीर्घकालीन मागणीला यश आले असून, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज ९ मार्चपासून नवीन रिक्षा परवाने देण्यास स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या निर्णयाचे कामगार नेते काशिनाथ नखाते आणि कष्टकरी रिक्षा-टॅक्सी संघर्ष महासंघाने सहर्ष स्वागत केले आहे.

परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, राज्यातील ५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये रिक्षा परवान्यांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या सल्ल्यानुसार, स्थानिक परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन ऑटो रिक्षांना कोणत्या निकषांवर परवाने द्यावेत, याचा अंतिम निर्णय आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे.

काशिनाथ नखाते यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे:

  • परवान्यांचा सुळसुळाट: गरज नसलेल्या आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींनीही परमिट काढल्यामुळे मूळ रिक्षा चालकांवर अन्याय होत होता.

  • वाहतूक कोंडी: शहरांमधील वाढती रिक्षांची संख्या वाहतूक नियोजनासाठी डोकेदुखी ठरत होती.

  • आगामी मागण्या: रिक्षा चालकांचे महामंडळ त्वरित कार्यान्वित करावे, पेन्शन योजना सुरू करावी आणि अपघाती विमा संरक्षण मोठ्या प्रमाणात द्यावे.

कष्टकरी रिक्षा-टॅक्सी संघर्ष महासंघातर्फे राजू बोराडे, गुरु बडदाळे, शामसुद्दीन शेख, सुभाष वाशिमकर, मनोज घोडके, रोहन मुरगुंड, रवी चव्हाण, संजय शिंगे, दिगंबर बाळूरे, राम बिरादार आणि आतिश वडमारे यांनी या निर्णयाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे. मोटार वाहन (दुरुस्ती) अधिनियम, २०१९ नुसार राज्य सरकारला मिळालेल्या लवचिकतेचा हा योग्य वापर असल्याचे संघटनांनी म्हटले आहे.

या निर्णयामुळे आता रिक्षा व्यवसायातील ‘मुक्त स्पर्धा’ मर्यादित होऊन प्रामाणिक रिक्षा चालकांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!