news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड तक्रारींवर आता ‘ऑन द स्पॉट’ तोडगा! सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला जनसंवाद; दर सोमवारी पूर्वपरवानगीशिवाय नागरिकांना आयुक्तांशी साधता येणार थेट संवाद

तक्रारींवर आता ‘ऑन द स्पॉट’ तोडगा! सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला जनसंवाद; दर सोमवारी पूर्वपरवानगीशिवाय नागरिकांना आयुक्तांशी साधता येणार थेट संवाद

पोलीस आणि जनतेतील अंतर होणार कमी! 'शिवनेरी हॉल'मध्ये ७६ नागरिकांनी मांडल्या तक्रारी; घरफोडीतील मुद्देमाल १०० टक्के परत मिळाल्याने आयुक्तांचा विशेष सत्कार. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


‘पोलीस आयुक्तांची भेट’: पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विनापरवाना थेट संवादामुळे सुटणार समस्या!


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, १० मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत नागरिकांशी अधिक प्रभावी, पारदर्शक आणि सकारात्मक संवाद प्रस्थापित करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “पोलीस आयुक्तांची भेट” या विशेष उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. सोमवारी, ९ मार्च २०२६ रोजी पोलीस आयुक्तालय येथील ‘शिवनेरी हॉल’मध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात ७६ हून अधिक नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या.

या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी नागरिकांना कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. नागरिक थेट नियोजित वेळेत आयुक्तालयात येऊन आयुक्तांशी संवाद साधू शकतात.

या कार्यक्रमावेळी केवळ पोलीस आयुक्तच नव्हे, तर सह-पोलीस आयुक्त, सर्व अप्पर पोलीस आयुक्त, सर्व पोलीस उपायुक्त प्रत्यक्ष हजर होते. तसेच, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक देखील जोडले गेले होते. यामुळे नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने निर्णय घेणे सुलभ झाले.

दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्यातील (गु.र.नं. ५१०/२०२५) फिर्यादी परमेश्वर गिराम यांनी या कार्यक्रमात विशेष उपस्थिती लावली. पोलिसांनी त्यांच्या गुन्ह्यातील चोरीला गेलेले सोन्याचे दागिने १०० टक्के परत मिळवून दिल्याबद्दल त्यांनी पोलीस आयुक्तांचा सत्कार केला आणि पोलिसांच्या कामगिरीचे जाहीर कौतुक केले.

यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील’ऑर्थोपेडिक डॉक्टर असोसिएशन‘चे पदाधिकारी देखील उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील समस्या मांडल्या आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी पुढाकार दर्शविला. याशिवाय, अनेक नागरिकांनी वाहतूक कोंडी आणि सुरक्षा विषयक महत्त्वाच्या सूचना मांडल्या.

पोलीस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे की, हा उपक्रम दर सोमवारी असाच चालू राहणार आहे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी, विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, उद्योजक आणि औद्योगिक प्रतिनिधींनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या तक्रारी व सूचना थेट मांडाव्यात, असे आवाहन जनसंपर्क अधिकारी, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!