news
Home मुंबई “मोठ्या कारखान्यांना तत्काळ परवानगी, मग गरिबांच्या कायद्याला का उशीर?” काशिनाथ नखाते यांचा सरकारला रोखठोक सवाल; हक्काच्या संरक्षणासाठी आझाद मैदानात हजारो कष्टकऱ्यांचा ठिय्या

“मोठ्या कारखान्यांना तत्काळ परवानगी, मग गरिबांच्या कायद्याला का उशीर?” काशिनाथ नखाते यांचा सरकारला रोखठोक सवाल; हक्काच्या संरक्षणासाठी आझाद मैदानात हजारो कष्टकऱ्यांचा ठिय्या

मुंबईत फेरीवाल्यांचा ऐतिहासिक 'एल्गार'! २०१४ च्या कायद्याची १२ वर्षांनंतरही रखडलेली अंमलबजावणी; पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातील हजारो कष्टकरी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर. (@२०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


आझाद मैदानात फेरीवाल्यांची गर्जना! ‘पथ विक्रेता कायद्या’च्या अंमलबजावणीसाठी राज्यभरातून हजारो हातागाडीवाले मुंबईत


मुंबई/पिंपरी प्रतिनिधी: पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, १२ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज

मुंबई : “फेरीवाला कायदा लागू करा, आमच्या पोटावर पाय देऊ नका,” अशा संतप्त घोषणांनी आज मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदान दणाणून गेले. नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो फेरीवाल्यांनी आज आपल्या हक्कांसाठी मुंबईत भव्य ‘एल्गार’ पुकारला.

पिंपरी-चिंचवडसह पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर अशा विविध जिल्ह्यांमधून फेरीवाले या आंदोलनासाठी मुंबईत दाखल झाले होते.

आंदोलनाचे नेतृत्व करताना महाराष्ट्र हॉकर फेडरेशनचे कार्याध्यक्ष आणि कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, “सरकार एखादा मोठा कारखाना किंवा कंपनी सुरू करण्यासाठी काही दिवसांत परवानगी देते; मात्र २०१४ मध्ये संसदेत मंजूर झालेल्या पथ विक्रेता (फेरीवाला) कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला १२ वर्षे का लागतात? हा सर्वसामान्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे.”

आंदोलकांच्या प्रमुख पाच मागण्या:

१. कायद्याची अंमलबजावणी: २०१४ च्या पथ विक्रेता कायद्याची राज्यभरात तात्काळ व प्रभावी अंमलबजावणी करा.

२. तक्रार निवारण समिती: प्रत्येक महापालिकेत स्वतंत्र तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात यावी.

३. कलम ३८ ची अंमलबजावणी: कायद्यातील कलम ३८ नुसार फेरीवाल्यांसाठी विशेष कल्याणकारी योजना तयार करा.

४. कारवाईला लगाम: मुंबईसह राज्यभरात फेरीवाल्यांवर होणाऱ्या चुकीच्या आणि अन्यायकारक जप्ती कारवाया थांबवा.

५. नोंदणी आणि संरक्षण: सर्व पात्र फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांना त्वरित प्रमाणपत्रे द्या.

या आंदोलनात सचिव विनिता बाळेकुंद्री, कॉ. प्रकाश रेड्डी, संजय खांडे, बबन कांबळे, राजू बिराजदार यांच्यासह राज्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. आझाद मैदानातील या गर्दीमुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून, सरकार आता यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!