news
पिंपरीतील ‘श्रीटिकेल’ कंपनीच्या २७५ कामगारांनी केले रक्तदान; ‘वायसीएम’ मधील गरीब रुग्णांना मिळणार जीवनदान!पिंपरी-चिंचवडमधील १३४ मनपा शाळांमध्ये सुट्टीच्या दिवशी घुमला ‘ओंकार’ नाद! आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभागपिंपरी-चिंचवड मनपा आणि योग विद्या धामच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ संकल्पनेवर भव्य योग सोहळा!रहाटणीत आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह! आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज उद्यानात सामूहिक योगसाधनापिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्त
Home मुख्यपृष्ठ “शहराचे फुफ्फुस असलेल्या दुर्गादेवी टेकडीचे सौंदर्य जपा!” सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेवरून आयुक्तांनी प्रशासनाला झापले; हजेरी नोंदवह्यांची स्वतः केली तपासणी

“शहराचे फुफ्फुस असलेल्या दुर्गादेवी टेकडीचे सौंदर्य जपा!” सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेवरून आयुक्तांनी प्रशासनाला झापले; हजेरी नोंदवह्यांची स्वतः केली तपासणी

केवळ एसी केबिनमध्ये न बसता आयुक्त थेट कुदळवाडी, चिखली अन् पुनावळेच्या रस्त्यावर! पहाटेच्या 'सरप्राइज' दौऱ्याने आरोग्य विभागाची उडाली धावपळ; कचरा व्यवस्थापनाचा घेतला सखोल आढावा. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


आयुक्त पहाटेपासूनच ‘फिल्ड’वर! दुर्गादेवी टेकडी, जलशुद्धीकरण केंद्र आणि आरोग्य कार्यालयांची झाडाझडती; स्वच्छतेबाबत दिला ‘झिरो टॉलरन्स’चा इशारा


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: बालाजी नवले, १८ मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज सकाळी शहराच्या विविध भागांत प्रत्यक्ष फिरून स्वच्छता आणि नागरी सुविधांची पाहणी केली. केवळ कागदी घोड्यांवर विसंबून न राहता, आयुक्तांनी पहाटेपासूनच कुदळवाडी, चिखली, पुनावळे, तळवडे, रुपीनगर आणि त्रिवेणी नगर या परिसरांना भेटी देत कचरा व्यवस्थापन आणि आरोग्य सेवांचा सखोल आढावा घेतला.

या पाहणी दौऱ्यामुळे पालिकेच्या आरोग्य आणि स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.

शहराचे फुफ्फुस मानल्या जाणाऱ्या दुर्गादेवी टेकडी परिसराची आयुक्तांनी विशेष पाहणी केली. “हे ठिकाण शहराच्या वैभवात भर घालणारे आहे, त्यामुळे येथील वनस्पती आणि वृक्षसंपदेचे जतन होणे आवश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले.

  • स्वच्छतागृहांची तपासणी: टेकडी परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि नियमित स्वच्छता व देखभालीचे कडक निर्देश दिले.

  • नागरिकांशी संवाद: यावेळी टेकडीवर फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन आयुक्तांनी पाणी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेची तांत्रिक माहिती घेतली. शहराला पुरवल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखण्याबाबत त्यांनी जलनिस्सारण आणि पाणीपुरवठा विभागाला सूचना दिल्या.

निगडी येथील यमुनानगर आरोग्य कार्यालयाला अचानक भेट देऊन आयुक्तांनी तेथील दैनंदिन हजेरी नोंदवह्या (Attendance Registers) स्वतः तपासल्या. “वेळेचे पालन न करणे किंवा नागरिकांना सेवा देताना हलगर्जीपणा करणे खपवून घेतले जाणार नाही,” असा सज्जड दम त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला.

कचरा संकलनाची नियमितता आणि आरोग्य पथकांची क्षेत्रीय उपस्थिती यावर आयुक्तांनी भर दिला. वॉर्ड स्तरावरील कामाची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांनी आरोग्य निरीक्षकांना स्पष्ट सूचना केल्या.

या दौऱ्यात सहाय्यक आरोग्याधिकारी महेश आढाव, मुख्य आरोग्य निरीक्षक कांचनकुमार इंदलकर, आरोग्य निरीक्षक रामचंद्र शिंगाडे, सहाय्यक आरोग्य निरीक्षक रवी रोकडे आणि आरोग्य मुकादम मल्लिकार्जुन कुरवार उपस्थित होते.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!