समतेच्या संगराचे शताब्दी वर्ष! पिंपरीतील भीमसृष्टीत चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २० मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष:
पिंपरी : भारतीय सामाजिक क्रांतीच्या इतिहासातील सुवर्णक्षण असलेल्या ‘महाड चवदार तळे सत्याग्रहा’च्या शताब्दी वर्षाचा शुभारंभ पिंपरी येथे उत्साहात करण्यात आला. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई स्मारक समितीच्या वतीने पिंपरीतील ऐतिहासिक भीमसृष्टी स्मारक परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
२० मार्च १९२७ रोजी महाड येथे झालेल्या या ऐतिहासिक सत्याग्रहाने दलितांना मानवी हक्क आणि सामाजिक समतेची नवी दिशा दिली होती. आज या घटनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भीमसृष्टी परिसर ‘भीममय’ झाला होता.
अभिवादन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी चवदार तळे सत्याग्रहाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. “शंभर वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी दिलेला हा लढा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी नव्हता, तर तो मानवी प्रतिष्ठा आणि समतेसाठी होता. या आंदोलनाची प्रेरणा आजही समाजाला अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देते,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या अभिवादन सोहळ्याला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये:
-
बापूसाहेब गायकवाड, बाळासाहेब रोकडे, संतोष जोगदंड.
-
विलास कांबळे, दत्ताभाऊ गायकवाड, रमेश कांबळे.
-
रमेश चिमुरकर, के. एम. बुक्तर, प्रकाश बुक्तर.
-
प्रमोद शेरे, नारायण मस्के आणि स्मारक समितीचे अन्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


