news
Home पिंपरी चिंचवड “कचरा कुंडीमुक्त आणि सुंदर शहरासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे!” महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन; २४ मार्चपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणीची शेवटची संधी

“कचरा कुंडीमुक्त आणि सुंदर शहरासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे!” महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन; २४ मार्चपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणीची शेवटची संधी

'जागतिक पुनर्वापर दिना'निमित्त महापालिकेचा अभिनव उपक्रम! ३२ प्रभागांमधील 'ब्लॅक स्पॉट्स'चे होणार सौंदर्यीकरण; टाकाऊ वस्तूंपासून साकारणार कलात्मक कलाकृती. (@ २०२६ | मॅक्स मंथन विशेष)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


कचरा नव्हे, ही तर कला! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ‘वेस्ट टू वंडर’ स्पर्धेचे आयोजन; टाकाऊ वस्तूंनी नटणार शहराचे कोपरे


पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी: बालाजी नवले, २० मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छतेसोबतच सौंदर्याचा नवा आयाम देण्यासाठी महानगरपालिकेने कंबर कसली आहे. ‘जागतिक पुनर्वापर दिना’चे (Global Recycling Day) औचित्य साधून महापालिकेच्या वतीने आठही क्षेत्रीय कार्यालयांसाठी ‘वेस्ट टू वंडर’ या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून शहरातील ३२ प्रभागांमध्ये टाकाऊ वस्तूंपासून कलात्मक कलाकृती साकारल्या जाणार आहेत.

महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने ही स्पर्धा आखली आहे.

या स्पर्धेचा मुख्य भर ‘कचरा संवेदनशील’ (Chronic Garbage Spots) ठिकाणांचे रूप पालटण्यावर आहे. ज्या ठिकाणी नागरिक वारंवार कचरा टाकतात, अशा जागा स्वच्छ करून तिथे टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या सुंदर कलाकृती बसवल्या जातील. यामुळे शहराचे सौंदर्यीकरण होईलच, पण नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकताही वाढेल.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महापालिकेने ऑनलाईन अर्ज मागवले आहेत.

  • नोंदणीची अंतिम मुदत: २४ मार्च २०२६ (दुपारी १२ वाजेपर्यंत)

  • नोंदणी दुवा (Link): https://forms.gle/LsxTPH6axEaak4LW7

“वेस्ट टू वंडर स्पर्धेमुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबरोबरच सर्जनशीलतेची जाणीव निर्माण होईल. टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून शहर अधिक सुंदर आणि वसुंधरापूरक बनविण्यासाठी हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी ठरेल.”

रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड.

“हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नसून, नागरिकांमध्ये वसुंधरापूरक सवयी रुजविण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकासासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरेल.”

डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड.

सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी विश्वास व्यक्त केला की, हा उपक्रम शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि वसुंधरापूरक जीवनशैलीस चालना देणारा ठरेल. या स्पर्धेच्या नियोजनासाठी उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग विशेष प्रयत्न करत आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!