news
“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप“कोणत्याही आदेशाशिवाय महिलांकडून रात्री-बेरात्री करून घेतली जातेय साफसफाई!” विजयाताई साठे यांचा कंत्राटदारांवर गंभीर आरोप; दोषींना ‘ब्लॅकलिस्ट’ करून गुन्हे दाखल करण्याची मागणी“रुग्णवाहिका आणि औषधांचा तुटवडा दूर करा!” पदमपाणी मंगलम येथे रंगला आरोग्य जनसंवाद; तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता वानखडे यांच्याकडून अडचणी सोडवण्याचे आश्वासन“रुग्णवाहिकांना रस्ता मिळेना, पदपथांवर माफियांचा कब्जा!” वायसीएम आणि डी.वाय. पाटील रुग्णालय परिसरात अनधिकृत टपऱ्यांचा विळखा; राजकीय दबावामुळे कारवाई थंडावल्याचा ननावरे यांचा गंभीर आरोप“एका मातेचा सन्मान राखण्यासाठी राजगुरूंच्या आईने स्वतःच्या पुत्राची भेट नाकारली!” किरणजीत सिंग यांनी सांगितली लाहोरमधील ऐतिहासिक आठवण; शहीद पार्वतीबाईंच्या त्यागाला सलाम करण्यासाठीच पुणे दौरा
Home पिंपरी चिंचवड “रुग्णवाहिकांना रस्ता मिळेना, पदपथांवर माफियांचा कब्जा!” वायसीएम आणि डी.वाय. पाटील रुग्णालय परिसरात अनधिकृत टपऱ्यांचा विळखा; राजकीय दबावामुळे कारवाई थंडावल्याचा ननावरे यांचा गंभीर आरोप

“रुग्णवाहिकांना रस्ता मिळेना, पदपथांवर माफियांचा कब्जा!” वायसीएम आणि डी.वाय. पाटील रुग्णालय परिसरात अनधिकृत टपऱ्यांचा विळखा; राजकीय दबावामुळे कारवाई थंडावल्याचा ननावरे यांचा गंभीर आरोप

अतिक्रमण कारवाईत प्रशासन हतबल? प्रभाग २० मधील बकाल अवस्थेवरून नगरसेवक जितेंद्र ननावरे आक्रमक; "पदपथ गिळंकृत करणाऱ्या माफियांच्या मुसक्या आवळा, अन्यथा परिसराचे नाव बदला!" (@ २०२६ | मॅक्स मंथन विशेष)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


संत तुकारामनगरचे नाव बदलून ‘टपरीनगर’ करा! नगरसेवक जितेंद्र ननावरे यांचा आयुक्तांना खोचक पत्राद्वारे इशारा; टपरीमाफियांच्या दहशतीमुळे नागरिक हैराण


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २० मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २० मधील संत तुकारामनगर परिसरात टपरीमाफिया आणि अनधिकृत टपरीधारकांनी घातलेल्या धुमाकूळावरून स्थानिक नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी थेट आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना लक्ष्य केले आहे. “जर तुम्हाला अतिक्रमण हटवता येत नसेल, तर या परिसराचे नाव बदलून अधिकृतपणे ‘टपरीनगर’ करा,” अशा शब्दांत ननावरे यांनी प्रशासनाला घरचा आहेर दिला आहे.

या संदर्भात त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात परिसरातील बकाल अवस्था आणि टपरीमाफियांच्या गुंडगिरीचा पाढाच वाचला आहे.

  • टपरीमाफियांचा सुळसुळाट: मेट्रो स्टेशन परिसर, वल्लभनगर एसटी स्थानक, वायसीएम रुग्णालय आणि डी.वाय. पाटील रुग्णालय परिसरातील पदपथांवर टपरीमाफियांनी कब्जा केला आहे. हे माफिया पदपथ भाड्याने देऊन लाखो रुपये वसूल करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • रुग्णवाहिकांना अडथळा: रुग्णालयांच्या समोरील रस्त्यावर दुतर्फा अतिक्रमणे झाल्याने गंभीर रुग्णांना घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिका वारंवार वाहतूक कोंडीत अडकत आहेत. यामुळे रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

  • नागरिकांना दमदाटी: अनधिकृत टपरीधारक रस्त्यावर कचरा आणि सांडपाणी टाकत असून, स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यास त्यांना टपरीधारकांकडून धमकावले जात आहे.

  • राजकीय दबाव: महापालिका प्रशासन कारवाईसाठी आल्यास, हे टपरीधारक बड्या नेत्यांचे फोन लावून अधिकाऱ्यांवर दबाव आणतात, ज्यामुळे कारवाई थंडावते, असे पत्रात नमूद केले आहे.

नगरसेवक ननावरे यांनी पत्रात संताप व्यक्त करताना म्हटले आहे की, “संत तुकारामनगरमध्ये पायी चालणाऱ्यांना जागा शिल्लक नाही. पदपथ पूर्णपणे गिळंकृत झाले आहेत. जर प्रशासन या माफियांच्या विरोधात कारवाई करण्यास असमर्थ असेल, तर त्यांनी या भागाचे नाव ‘टपरीनगर’ असे अधिकृतपणे जाहीर करावे.”

विद्यार्थी, रुग्ण आणि सामान्य नागरिकांना या बकालपणातून मुक्त करण्यासाठी तात्काळ अनधिकृत टपऱ्यांवर बुलडोझर फिरवावा आणि वाहतूक कोंडीतून सुटका करावी, अशी मागणी जोर धरत आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!