news
पूरणनगरमध्ये वाळलेल्या झाडांमुळे मृत्यूची टांगती तलवार; वारंवार तक्रार करूनही मनपा उद्यान विभागाचे ‘डोळेझाक’!पिंपळे सौदागरच्या लिनिअर गार्डनमध्ये रंगला भक्ती आणि योगाचा अनोखा संगम! ‘द आर्ट ऑफ लिविंग’ आणि भाजपचा संयुक्त उपक्रमरहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेत
Home पिंपरी चिंचवड “कोणत्याही आदेशाशिवाय महिलांकडून रात्री-बेरात्री करून घेतली जातेय साफसफाई!” विजयाताई साठे यांचा कंत्राटदारांवर गंभीर आरोप; दोषींना ‘ब्लॅकलिस्ट’ करून गुन्हे दाखल करण्याची मागणी

“कोणत्याही आदेशाशिवाय महिलांकडून रात्री-बेरात्री करून घेतली जातेय साफसफाई!” विजयाताई साठे यांचा कंत्राटदारांवर गंभीर आरोप; दोषींना ‘ब्लॅकलिस्ट’ करून गुन्हे दाखल करण्याची मागणी

कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांच्या आर्थिक शोषणाचा धक्कादायक प्रकार उघड! 'एटीएम कार्ड' स्वतःकडे ठेवून कंत्राटदारांकडून पिळवणूक; अखिल भारतीय बहुजन शक्ती सेनेचा महापौर रवि लांडगे यांच्याकडे संताप. (@ २०२६ | मॅक्स मंथन विशेष)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


महिला सफाई कामगारांचे रात्रीचे काम थांबवा आणि ‘एटीएम’ जप्त करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका! बहुजन शक्ती सेनेची महापौरांकडे आक्रमक मागणी


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २० मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कंत्राटी महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या शोषणाचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. कोणत्याही लेखी आदेशाशिवाय या महिलांकडून रात्री-बेरात्री रस्त्यांची साफसफाई करून घेतली जात असून, कंत्राटदार त्यांचे ‘एटीएम कार्ड’ स्वतःकडे ठेवून आर्थिक पिळवणूक करत असल्याचा खळबळजनक आरोप अखिल भारतीय बहुजन शक्ती सेनेने केला आहे.

या संदर्भात संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा विजयाताई साठे यांच्या नेतृत्वाखाली महापौर रवि लांडगे यांना गुरुवारी सविस्तर निवेदन देण्यात आले.

१. बेकायदेशीर रात्रपाळी: महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून केवळ दिवसा काम करून घेणे अपेक्षित असताना, अनेक ठिकाणी त्यांना रात्रीच्या वेळी रस्त्यावर कामाला लावले जात आहे. याला कोणताही अधिकृत प्रशासकीय आधार नाही.

२. एटीएम कार्ड जप्त: कंत्राटदार या गरीब आणि गरजू महिलांची एटीएम कार्डे स्वतःच्या ताब्यात ठेवतात. पगार जमा झाल्यावर स्वतः पैसे काढून महिलांना कमी रक्कम हातावर टेकवली जाते, असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

३. कमी वेतन: कामाच्या स्वरूपाच्या तुलनेत या महिलांना अत्यंत तुटपुंजा पगार दिला जात असून त्यांचे मोठ्या प्रमाणावर शोषण सुरू आहे.

महिलांच्या सुरक्षेचा आणि आर्थिक हक्कांचा प्रश्न उपस्थित करत विजयाताई साठे यांनी मागणी केली की, “जे कंत्राटदार महिला कामगारांचे शोषण करत आहेत, त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना महापालिकेच्या काळ्या यादीत (Blacklist) टाकावे.”

निवेदन स्वीकारताना महापौर रवि लांडगे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत महापालिका प्रशासन कोणते कठोर पाऊल उचलते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी बहुजन शक्ती सेनेचे कार्याध्यक्ष मनोज प्रधान, सामाजिक कार्यकर्त्या धनश्री बोरगावे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!