news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड “७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप

“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप

पहाटेच्या वेळी महिलांना लक्ष्य करणाऱ्या सराईत चोरट्याचा पर्दाफाश! मांजरीतून ओमकार बनसोडेला हिंजवडी पोलिसांनी केली अटक; १०० हून अधिक कॅमेऱ्यांच्या तांत्रिक तपासाने आरोपीचा लावला छडा. (@२०२६ | मॅक्स मंथन क्राईम डायरी)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिला सावधान! हिंजवडी पोलिसांनी १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून चैन स्नॅचरला ठोकल्या बेड्या; दोन तोळ्यांचे दागिने जप्त


हिंजवडी, पिंपरी प्रतिनिधी : आकाश कांबळे २० मार्च २०२६ | मॅक्स मंथन क्राईम डायरी:

हिंजवडी : पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावणाऱ्या एका सराईत चोरट्याला हिंजवडी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून दोन तोळ्यांचे सोन्याचे मिनी गंठण जप्त करण्यात आले असून, या कारवाईमुळे परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या साखळी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

ओमकार राजेश बनसोडे (वय २३, रा. मांजरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार विशाल विलास काळे हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

७ मार्च २०२६ रोजी पहाटे ६ च्या सुमारास हिंजवडी परिसरात एक महिला मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना धक्का देऊन खाली पाडले आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने ओरबाडून नेले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी तपास पथक रवाना केले.

  • पोलिसांनी घटनास्थळापासून ते आरोपींच्या पळण्याच्या मार्गावरील १०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.

  • तपास पथकातील कर्मचारी कबीर पिंजारी, कारभारी पालवे आणि ओमप्रकाश कांबळे यांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपीची ओळख पटवली.

  • पथकाने मांजरी (पुणे) परिसरातून आरोपी ओमकार बनसोडे याला ताब्यात घेतले.

आरोपी ओमकार बनसोडे याने आपल्या साथीदारासह मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास केल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. या अटकेमुळे हिंजवडी आणि वाकड परिसरातील इतरही अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशीकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेलीसारंग आवाड, उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे, गुन्हे निरीक्षक हृषिकेश घाडगे, सपोनि सोमनाथ पांचाळ, दुर्गानाथ साळी आणि त्यांच्या पथकाने केली.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!