महाळुंगे पोलिसांची धडाकेबाज कारवाई! सराईत वाहन चोरटा अटकेत; ४ दुचाकींसह घरफोडीचा गुन्हा उघड, १.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २१ मार्च २०२६ | मॅक्स मंथन क्राईम डायरी
महाळुंगे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून, त्याच्याकडून ४ चोरीच्या दुचाकी आणि घरफोडीतील सोन्याचे दागिने असा एकूण १,५०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि पोलीस उपायुक्त (परिमंडळ ४) श्रीमती श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
भोसरी पोलीस ठाण्याने निष्पन्न केलेल्या एका आरोपीची माहिती मिळाल्यानंतर, महाळुंगे पोलिसांनी प्रकाश तेज विश्वकर्मा (वय २०, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) याला येरवडा कारागृहातून ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ड्युमळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपीची कौशल्यपूर्ण चौकशी केली असता, त्याने महाळुंगे एम.आय.डी.सी. आणि आजूबाजूच्या परिसरातून वाहने चोरल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान खालील गुन्हे उघडकीस आले असून वाहने जप्त करण्यात आली आहेत:
| अ. क्र. | पोलीस ठाणे | गुन्हा रजिस्टर क्र. | वाहन/मु मुद्देमाल | अंदाजित किंमत |
| १ | महाळुंगे एम.आय.डी.सी. | ४५/२०२६ | यामाहा एफ झेड (MH 14 FW 4277) | ३०,०००/- |
| २ | महाळुंगे एम.आय.डी.सी. | १३३/२०२६ | स्प्लेंडर (MH 14 JB 6379) | ३५,०००/- |
| ३ | महाळुंगे एम.आय.डी.सी. | १३८/२०२६ | होंडा शाईन (MH 14 BP 1650) | ३०,०००/- |
| ४ | तळेगाव एम.आय.डी.सी. | २९/२०२५ | होंडा शाईन (MH 12 RD 3302) | ३५,०००/- |
| ५ | महाळुंगे (घरफोडी) | ४३/२०२६ | १.५ ग्रॅम सोन्याचे पदक | २०,०००/- |
| एकूण | १,५०,०००/- |
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ड्युमळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, सपोनि भास्कर पुल्ली, तसेच अंमलदार देवराम पारधी, विश्वास नाणेकर, किशोर सांगळे, युवराज बिराजदार, चेतन सावंत, राजेंद्र खेडकर, राजेश गिरी आणि इतर सहकाऱ्यांनी केली आहे.
“शहरातील वाहन चोरीच्या ठिकाणांचे ‘क्राईम मॅपिंग’ करून आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही गुन्हेगारांपर्यंत पोहोचलो आहोत. नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी लॉक करून पार्क करावीत.”
— श्वेता खेडकर, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ४.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
