news
परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानामुळे पासपोर्टच्या वैधतेवर देशात मोठा गदारोळ; विरोधी पक्षांचा थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा!जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा चालणार; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडून ‘अ’ प्रभाग अधिकाऱ्यांना थेट आदेश!औद्योगिकनगरीचे शिल्पकार दिवंगत अण्णासाहेब मगर यांना पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड मनपा मुख्यालयात भावपूर्ण आदरांजली!भोसरी विधानसभा मतदारसंघात ३० जूनपासून विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहीम; ४८३ ‘BLO’ करणार घरोघरी जाऊन तपासणी!पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचा विकासकामांचा धडाका; निगडी अतिरिक्त मेट्रो स्थानक निधीसह पुनावळे फायर स्टेशनला मंजुरी!
Home पिंपरी चिंचवड “शिक्रापूर ते जातेगावपर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजने लावला छडा!” ६ महिला आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; रिक्षा आणि ट्रकचा वापर करून पसार होणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

“शिक्रापूर ते जातेगावपर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजने लावला छडा!” ६ महिला आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; रिक्षा आणि ट्रकचा वापर करून पसार होणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

प्रवाशांच्या दागिन्यांवर डल्ला मारणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड! गुन्हे शाखा युनिट-३ ची शिक्रापूरमध्ये धडाकेबाज कारवाई; गर्दीचा फायदा घेऊन मुलांच्या सहाय्याने करायच्या चोरी. (२३ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये लहान मुलांच्या मदतीने बसमध्ये चोरी करणाऱ्या महिलांची टोळी जेरबंद; ८९,५०० रुपयांचा ऐवज जप्त

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दिनांक: २३ मार्च २०२६, मॅक्स मंथन क्राईम डायरी:


पिंपरी चिंचवड: प्रवासादरम्यान बसमध्ये लहान मुलांचा वापर करून प्रवाशांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या एका आंतरजिल्हा महिला टोळीचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ महिला आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ८९,५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे.

भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) अन्वये दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-३ करत होते. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळापासून ते शिक्रापूरपर्यंतच्या विविध रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची तांत्रिक विश्लेषण केले. यामध्ये आरोपी महिला चोरी केल्यानंतर रिक्षा आणि ट्रकचा वापर करून पसार होत असल्याचे निष्पन्न झाले.

गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित संशयित महिला शिक्रापूर जवळील जातेगाव येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जातेगाव येथे सापळा रचला आणि महिला सहाय्यक कक्षाच्या मदतीने ६ महिलांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन लहान मुलांच्या मदतीने सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली.

ताब्यात घेतलेले आरोपी:

१. अनुराधा उर्फ पार्वती मंगेश बुंदिनाथ (वय ३० वर्षे)

२. अंजली राम (वय २१ वर्षे)

३. राधा चरण वैदू (वय २१ वर्षे)

४. कल्पना बाला वैदू (वय २१ वर्षे)

५. श्वेता उमर वैदू (वय २१ वर्षे)

६. जानकी अनिल वैदू (वय ३० वर्षे)

हे सर्व आरोपी सध्या जातेगाव (खुर्द), शिक्रापूर येथे राहत असून मूळचे मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. २१ मार्च २०२६ रोजी पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

ही कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. संदीप पखाले, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तपास पथकात गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक गोडबोले आणि कर्मचारी बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, सागर सुर्यवंशी, मनोज साबळे, नागेश गोनटे, स्वप्नील महाले, शशिकांत नांगरे, तुषार वराडे, समीर काळे, सुंदर थोरात, सुधीर दांगट, निखिल फापाळे, राजकुमार इघारे, तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे हुलगे, माळी आणि कारके यांचा समावेश होता.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!