news
खामगावमध्ये अण्णाभाऊ साठे पुतळ्यावरून संघर्ष पेटला! परिमल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ‘आक्रोश मोर्चा’तून प्रशासकीय कोंडी फोडण्याचा निर्धारपिंपळे गुरवमध्ये ‘काव्यात्मा’ पुरस्कारांचा सोहळा आणि कवी संमेलनाचा जागर! इरान्ना निंबाळ आणि निलेश शेंबेकर यांच्यासह ३५ कवींनी जिंकली रसिकप्रेक्षकांची मने“हिंद दी चादर” गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या चरणी सेवा अर्पण! महापौरांच्या तत्पर नियोजनामुळे हजारो भाविकांचा प्रवास झाला सुखकर“आजचे विद्यार्थीच घडवतील प्रदूषणमुक्त शहर!” वाकडमधील महापालिका शाळेत पथनाट्याद्वारे स्वच्छतेचा ‘ज्ञान आणि प्रेरणा’ संगम“कामगार चळवळीला दिशा देणारे अण्णासाहेब पाटील यांचे विचार आजही प्रेरणादायी!” पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे के.एस.बी. चौकात थोर नेत्याला वंदन
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये शहीदांना भावपूर्ण आदरांजली! दापोडीत क्रांतीकारकांच्या पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते अभिवादन

पिंपरी-चिंचवडमध्ये शहीदांना भावपूर्ण आदरांजली! दापोडीत क्रांतीकारकांच्या पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते अभिवादन

शहीद दिनानिमित्त महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीत थोर क्रांतीकारकांचा जागर! महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण; तरुण पिढीला प्रखर देशभक्तीचे आवाहन. | @२०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


क्रांतीकारकांचे बलिदान राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरणादायी! पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना विनम्र अभिवादन


पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : आकाश कांबळे, २३ मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष:

पिंपरी : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील धगधगते निखारे शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदान दिनानिमित्त (शहीद दिन) आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर क्रांतीकारकांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. “शहीदांचे धैर्य आणि देशप्रेम प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग नोंदवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,” असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी येथील महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारतीत आयोजित कार्यक्रमात महापौरांच्या हस्ते क्रांतीकारकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले की, “शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी हसत-हसत फाशीचा फास स्वीकारून देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या या त्यागामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत. आजच्या तरुण पिढीने या महामानवांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे गरजेचे आहे.”

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य इमारतीतील कार्यक्रमानंतर दापोडी येथील शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहर सुधारणा समितीचे सभापती संजय उर्फ नाना काटे, नगरसदस्य राजू बनसोडे, नगरसदस्या स्वाती काटे आणि प्रतिक्षा लांघी जवळकर उपस्थित होत्या. स्थानिक नागरिकांनीही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रांतीकारकांच्या जयघोषात परिसर दुमदुमवून टाकला.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!