news
MAHATET २०२६ चा बिगुल वाजला! २१ जूनला राज्यभरात रंगणार परीक्षा; पात्रता धारकांनी २७ मार्चपासून भरावेत अर्जअमरावती विभागात ३,५४७ अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणे न्यायालयात प्रलंबित! जिल्हा दक्षता समितीने दरमहा आढावा घेण्याच्या सूचनाअमरावतीच्या ३८ गुणवंतांना ‘TCS’ मध्ये नियुक्तीची पत्रे! ‘पंडित दीनदयाल उपाध्याय मेळाव्या’त तरुणांच्या स्वप्नांना मिळाली भरारीभामा आसखेड प्रकल्पातून शहराला मिळणार १६७ दशलक्ष लिटर जादा पाणी! महापालिका प्रशासनाकडून कामाला वेगपिंपरी-चिंचवड आरपीआयमध्ये खांदेपालट! विलास कांबळे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा; पँथर कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा मैदानात
Home पिंपरी चिंचवड PCMC महासभेत १३ तास खडाजंगी! मध्यरात्री १ वाजता अर्थसंकल्पावर शिक्कामोर्तब; भ्रष्ट कारभारावरून अधिकाऱ्यांची झाडाझडती

PCMC महासभेत १३ तास खडाजंगी! मध्यरात्री १ वाजता अर्थसंकल्पावर शिक्कामोर्तब; भ्रष्ट कारभारावरून अधिकाऱ्यांची झाडाझडती

सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रशासनाचे टोचले कान! ४१४ कोटींची वाढीव तरतूद असलेले सुधारित अंदाजपत्रक मंजूर; महापौर रवि लांडगे यांची नगरसेवकांच्या शिष्टाचारावर नाराजी, तर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना 'आर्थिक शिस्त' लावण्याचे नेत्यांचे आवाहन. | @ २०२६ | मॅक्स मंथन विशेष

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


पिंपरी-चिंचवडचे ९,३२२ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर; १३ तासांची वादळी चर्चा अन् मध्यरात्री १ वाजता सभेची सांगता


पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी: बालाजी नवले, २६ मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सन २०२६-२७ या वर्षाचे ९ हजार ३२२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंगळवारी मध्यरात्री १ वाजता जंगी चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२ वाजता सुरू झालेली ही विशेष सभा तब्बल १३ तास चालली. गेल्या वर्षाच्या तुलनेत ४१४ कोटींची वाढ असलेल्या या अर्थसंकल्पात सत्ताधाऱ्यांनी अनेक उपसूचना मांडत मोठे फेरबदल केले आहेत.

अंदाजपत्रकावरील चर्चेत सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांनी प्रशासनाचे कान टोचले. पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्ते आणि मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका यावेळी करण्यात आली. नगरसेवक विनोद नढे यांनी चर्चेच्या सुरुवातीलाच प्रशासकीय काळातील कारभारावर गंभीर आरोप केले.

सभेदरम्यान अनेक नवख्या नगरसेवकांनी सभागृहाचे नियम आणि शिष्टाचाराचे वाभाडे काढल्याचे पाहायला मिळाले. महापौरांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे, परवानगीशिवाय बोलणे आणि महापौरांऐवजी पक्षनेत्यांनी संधी दिल्याचे उल्लेख करणे, असे प्रकार घडले. यावर महापौर रवि लांडगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून “नगरसेवकांना प्रशिक्षणाची गरज आहे,” असे परखड मत मांडले.


“प्रशासनाने गेल्या चार वर्षांत भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. नवनियुक्त आयुक्तांनी आर्थिक शिस्त लावून इतिहास घडवावा आणि दोषी कंत्राटदारांना पाठीशी घालू नये.”

भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते

“काही चुकीच्या अधिकाऱ्यांमुळे आज आम्हाला जाहीरपणे बोलावे लागत आहे. जे झाले ते झाले, पण आता प्रशासनाला सुधारण्याचे काम आयुक्तांनी गांभीर्याने करावे.”

प्रशांत शितोळे, सत्तारूढ पक्षनेते

“स्थायी समितीने मांडलेले हे अंदाजपत्रक संतुलित आहे. महापौरांनी मांडलेल्या आणि सभागृहाने सुचवलेल्या सर्व उपसूचनांचा स्वीकार करून आम्ही शहराच्या विकासाला गती देऊ.”

अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!