news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड आरपीआयमध्ये खांदेपालट! विलास कांबळे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा; पँथर कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा मैदानात

पिंपरी-चिंचवड आरपीआयमध्ये खांदेपालट! विलास कांबळे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा; पँथर कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा मैदानात

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाची पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी संघटनात्मक बांधणी! प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत यांच्या उपस्थितीत नवीन फळीची घोषणा; ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्त्यांच्या संगमातून पक्षाला मिळणार बळ. | @ २०२६ | मॅक्स मंथन राजकीय विशेष

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


आरपीआयची नवीन कार्यकारणी जाहीर! शहराध्यक्षपदी विलास कांबळे तर सरचिटणीसपदी दयानंद वाघमारे; बाळासाहेब भागवत यांच्याकडून जोमाने कामाचा निर्धार


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २६ मार्च २०२६ | मॅक्स मंथन राजकीय विशेष:

पिंपरी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने पिंपरी-चिंचवड शहरात आपल्या संघटनात्मक बांधणीला गती दिली असून, शहराच्या नवीन कार्यकारणीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. “केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ही नवीन फळी जोमाने काम करेल,” असा विश्वास आरपीआय प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत यांनी व्यक्त केला.

पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष के. एम. बुक्तर, सचिव रमेश चिमूरकर आणि ज्येष्ठ नेत्या लताताई ओव्हाळ उपस्थित होत्या.

नवीन कार्यकारणीमध्ये अनुभवी आणि तरुण कार्यकर्त्यांचा संगम साधण्यात आला आहे:

  • शहर जिल्हाध्यक्ष: विलास कांबळे

  • सरचिटणीस: दयानंद वाघमारे

  • कार्याध्यक्ष: बाळासाहेब रोकडे आणि लिंबराज कांबळे

  • वरिष्ठ उपाध्यक्ष: दिलीप नाना साळवे

पश्चिम महाराष्ट्र सचिव रमेश चिमूरकर यांनी सांगितले की, गेल्या ३०-४० वर्षांपासून चळवळीत सक्रिय असणारे ज्येष्ठ पँथर कार्यकर्ते आणि नव्याने सहभागी झालेले युवा पँथर यांना एकत्रित करून ही कार्यकारणी तयार करण्यात आली आहे. माजी नगरसेविका लताताई ओव्हाळ यांनी स्पष्ट केले की, शहरातील गोरगरीब, वंचित आणि झोपडीधारकांना न्याय देण्यासाठी ही टीम वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.

शहराध्यक्ष विलास कांबळे यांनी उर्वरित कार्यकारणी जाहीर केली:

  • उपाध्यक्ष: बाळासाहेब जोगदंड, रमेश गजरमल, विशाल कदम, रघु गव्हाळे, प्रकाश बुक्तर, अशोक कांबळे, सुरेश आठवले, नंदू मस्के.

  • पक्षप्रवक्ता: भारत बनसोडे | संपर्क प्रमुख: विकास कडलक | प्रसिद्धी प्रमुख: अभिजीत चव्हाण.

  • इतर नियुक्त्या: सुंदर कांबळे (सदस्य), पांडुरंग कांबळे (संघटक), सुभाष मस्के (सह संघटक), तुकाराम गायकवाड (सहसचिव), बालाजी जाधव (सचिव), गोरख गायकवाड (सल्लागार).

याप्रसंगी खाजाभाई शेख, रमेश चिमूरकर, अंकुश कानडी, महिला शहराध्यक्ष कमलताई कांबळे, दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!