news
Home अकोला जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा! मुर्तिजापुरात रामनवमीच्या निमित्ताने ‘पाणेरी’ उपक्रमाचा शुभारंभ

जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा! मुर्तिजापुरात रामनवमीच्या निमित्ताने ‘पाणेरी’ उपक्रमाचा शुभारंभ

स्व. जुगलकिशोरजी आणि स्व. सौ. कौशल्यादेवी नागवान यांच्या स्मृतीप्रत्यर्थ स्तुत्य उपक्रम! आमदार हरिषभाऊ पिंपळे आणि नगराध्यक्ष हर्षलभाऊ साबळे यांच्या हस्ते 'गौ कृपा निवास' येथे लोकार्पण; रणरणत्या उन्हात भाविक आणि प्रवाशांना मिळणार थंड पाण्याचा आधार. | @ २०२६ | मॅक्स मंथन विशेष

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


मुर्तिजापूर: रामनवमीनिमित्त तहानलेल्या कंठांसाठी ‘पाणेरी’ सेवा! नागवान परिवारातर्फे जल सेवा केंद्राचे थाटात उद्घाटन


अकोला /मुर्तिजापुर प्रतिनिधी विलास सावळे, २७ मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष:

मुर्तिजापूर : रामनवमीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून आणि रणरणत्या उन्हात नागरिकांची तहान भागवण्यासाठी मुर्तिजापूर येथील नागवान परिवारातर्फे भव्य ‘पाणेरी’ (जल सेवा केंद्र) सुरू करण्यात आले आहे. स्व. श्री. पं. जुगलकिशोरजी मातादीनजी नागवान आणि स्व. सौ. कौशल्यादेवी जुगलकिशोरजी नागवान यांच्या पवित्र स्मृतीप्रत्यर्थ हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे.

२६ मार्च २०२६ रोजी दुपारी १२:३१ च्या शुभ मुहूर्तावर ‘गौ कृपा निवास’, स्टेशन विभाग येथे या जल सेवा केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मुर्तिजापूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री. हरिषभाऊ मारोतीआप्पाजी पिंपळे यांनी भूषवले. तर नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री. हर्षलभाऊ रामेश्वरजी साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पाणेरीचे पूजन आणि उद्घाटन श्री. अशोक जुगलकिशोर नागवानश्री. संजय जुगलकिशोर नागवान यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी नगरसेवक श्री. सचिन सुरेशबाप्पु देशमुख (प्रभाग क्र. ११), आरोग्य सभापती सौ. पुनमताई रवींद्र माडकर यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.

“परोपकाराय फलन्ति वृक्षा: परोपकाराय वहन्ति नद्य:।” (वृक्ष परोपकारासाठी फळे देतात आणि नद्या परोपकारासाठीच वाहतात) या उक्तीप्रमाणे नागवान परिवाराने हा समाजोपयोगी उपक्रम हाती घेतला आहे. रामनवमीच्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या हजारो भाविकांना आणि स्टेशन परिसरातील प्रवाशांना या थंड पाण्याचा मोठा आधार मिळणार आहे.

आमदार हरिषभाऊ पिंपळे यांनी नागवान परिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, “स्मृती जपण्याचा हा सर्वात सुंदर मार्ग असून, जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे.”


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!