पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवेतून २६ कर्मचारी सेवानिवृत्त; कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे – सह आयुक्त मनोज लोणकर
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दिनांक: ३१ मार्च २०२६,मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रगतीत सेवानिवृत्त होत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. कर्मचाऱ्यांची कार्यनिष्ठा आणि जबाबदारीच्या जाणीवेमुळेच महापालिकेला आज मोठा नावलौकिक प्राप्त झाला आहे,” असे गौरवपूर्ण उद्गार सह आयुक्त मनोज लोणकर यांनी काढले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्यालयातील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात माहे मार्च २०२६ अखेर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे २३ आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेले ३ अशा एकूण २६ कर्मचाऱ्यांचा सह आयुक्त मनोज लोणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना मनोज लोणकर म्हणाले की, “सेवानिवृत्ती हा कामाचा शेवट नसून आयुष्याचा एक नवा टप्पा आहे. या काळात कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवावा, आरोग्याची काळजी घ्यावी आणि आपले छंद जोपासावेत.”
सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे:
-
नियत वयोमानानुसार: कार्यालय अधीक्षक चंद्रकांत हुच्चे, विजय आभाणे, उज्वला म्हाब्दी, लेखापाल शुभांगी साळी, मुख्य लिपिक कैलास बाणेकर, रामचंद्र कांबळे, मुख्याध्यापक ज्योत्स्ना चौधरी, लॅब टेक्निशियन उर्मिला काळे, आरेखक नंदकुमार भोकरे, उपशिक्षिका स्वाती पडवळ, सुनिल लांघी, वॉर्ड बॉय बळवंत सोनवणे, शिपाई बापूराव कांबळे, लतीका गावडे, मारूती फडके, चंद्रकांत हगवणे, मजूर मनोहर गायकवाड, विजय पाटील, रखवालदार फ्रान्सिस खरात, सफाई कामगार भिमराज पवार, दिनकर भंडगे, सफाई सेवक विकास जगताप आणि गटरकुली रोहिदास गेंगजे.
-
स्वेच्छा सेवानिवृत्ती: मुख्याध्यापक मंगल आल्हाट, ए. एन. एम. सुप्रिया पवार आणि मुकादम शिवाजी गावडे.
या कार्यक्रमास ‘वायसीएम’ रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे, उप आयुक्त संदीप खोत, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्य लिपिक माया वाकडे यांच्यासह सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


