news
लुटियन्स दिल्लीतील ‘उच्चभ्रूंचा’ अड्डा बंद! साम्राज्यवादी मानसिकतेच्या ‘दिल्ली जिमखाना क्लब’वर मोदी सरकारचा हातोडाप्रशासनाचा पाठीचा कणा असलेल्या महसूल यंत्रणेला अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचे कडक ताकीद! आठवड्यातून एक दिवस गावपातळीवर तपासणी बंधनकारकपिंपरी-चिंचवड शहर १५ दिवस हाय अलर्टवर! पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकरांकडून जमावबंदीचे कडक आदेश जारी“सरकार भांडवलदारांच्या भूमिकेत, कामगारांना एकत्र येणे अनिवार्य!” चिंचवडमधील भव्य चर्चासत्रात डॉ. श्रीपाल सबनीस यांचे कडक प्रतिपादन‘एआय फॉर सायन्स’च्या नव्या सुवर्णयुगाची नांदी! जगप्रसिद्ध ‘डॅडलस’ नियतकालिकात ३३ जागतिक वैज्ञानिकांचे मोठे विचारमंथन
Home पिंपरी चिंचवड चिंचवडमध्ये सामाजिक भावनेतून आमदारांचा वाढदिवस! तालेरा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप

चिंचवडमध्ये सामाजिक भावनेतून आमदारांचा वाढदिवस! तालेरा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप

बापू काटे यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती; 'सेवा परमो धर्म' मानून कार्यकर्त्यांकडून लाडक्या नेत्याला शुभेच्छा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आमदार शंकरशेठ जगताप यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा; तालेरा रुग्णालय व अनाथ आश्रमात फळवाटप करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन

 

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दिनांक: ५ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

चिंचवड: चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री. शंकरशेठ जगताप यांचा वाढदिवस यंदा कोणताही डामडौल किंवा जल्लोष न करता अत्यंत साधेपणाने आणि ‘सेवा कार्याला’ प्राधान्य देऊन साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून आमदारांना आगळ्यावेगळ्या शुभेच्छा देण्यात आल्या.

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने चिंचवड येथील तालेरा रुग्णालय आणि पिंपळे गुरव येथील ममता अंध अनाथ कल्याण केंद्र येथे फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसेच अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत हा वाढदिवस खऱ्या अर्थाने सार्थ ठरवला. “लोकसेवेचा वसा घेतलेल्या लोकप्रतिनिधीचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपून साजरा करणे, हीच त्यांना खरी शुभेच्छा ठरेल,” अशा भावना भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस श्री. दिनेश काटे (पाटील) यांनी यावेळी व्यक्त केल्या.

या सेवा उपक्रमाप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेवक श्री. माऊली जगताप, नगरसेवक श्री. हर्षल ढोरे, श्री. सुरेशजी भोईर, नगरसेविका सौ. मनिषा चिंचवडे, चिंचवड विधानसभा प्रमुख श्री. काळुरामजी बारणे, संघटन सरचिटणीस श्री. मोरेश्वरदादा शेडगे, महामंत्री श्री. मधुकर बच्चे उपस्थित होते.

तसेच युवा मोर्चा प्रदेश सचिव श्री. अजित कुलथे, युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री. दिनेशजी यादव, माजी शहराध्यक्ष श्री. संकेतजी चौंधे, सरचिटणीस श्री. प्रसाद (बापू) कस्पटे, सरचिटणीस श्री. राहुलजी खाडे, सरचिटणीस श्री. सुमितजी घाटे, सरचिटणीस श्री. दिनेश काटे (पाटील) आणि युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त होणारी जाहिरातबाजी आणि फटाक्यांची आतिषबाजी टाळून, भाजपा युवा मोर्चाने सामाजिक कार्याला दिलेले महत्त्व पिंपरी-चिंचवड शहरात चर्चेचा विषय ठरले आहे. अनाथ मुले आणि गरजू रुग्णांना मदत करून साजरा करण्यात आलेल्या या ‘वाढदिवस सेवा उपक्रमा’चे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!