news
मोशी कचरा डेपो दुर्घटनेवरून पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय थरार; विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर सत्ताधाऱ्यांवर कडाडलेपिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीत मोठा भूकंप! महापालिका निवडणुकीत भोपळा फुटल्याने संपूर्ण कार्यकारिणी बरखास्तमोशी कचरा डेपोतील दुर्घटना म्हणजे मानवनिर्मित आपत्ती; मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीऔद्योगिकनगरीत भक्तीचा महापूर! आमदार शंकर जगताप आणि शत्रुघ्न (बापू) काटे यांनी घेतले संत तुकोबांच्या पालखीचे दर्शनपिंपरी-चिंचवड महापालिकेचा पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा; प्रत्येक झोनचा स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन प्लॅन तयार होणार
Home मुख्यपृष्ठ प्रशासकीय ढिसाळपणाचा पंचनामा! राळेगावच्या आमसभेत अधिकाऱ्यांची झाली मोठी कोंडी

प्रशासकीय ढिसाळपणाचा पंचनामा! राळेगावच्या आमसभेत अधिकाऱ्यांची झाली मोठी कोंडी

माजी मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; पाईपलाईन, रस्ते आणि पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून लोकप्रतिनिधींना धारेवर धरले | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

राळेगाव तालुका आमसभेत कविता धुर्वे यांनी प्रशासनाला धरले धारेवर; रखडलेल्या कामांवरून ग्रामस्थ आक्रमक

 

 

 

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी: नरेश राऊत, दिनांक: ५ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

राळेगाव: येथील पंचायत समितीच्या वतीने आयोजित वार्षिक आमसभा आणि पाणीटंचाई आढावा बैठकीत प्रशासकीय कारभाराचे वाभाडे निघाले. तालुक्यातील रखडलेली विकासकामे आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना प्रश्नांच्या सरबत्तीने भंडावून सोडले. यामध्ये आपटी येथील महिला प्रतिनिधी कविता धुर्वे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत प्रशासकीय ढिसाळपणाचा पंचनामा केला.

सभेत बोलताना कविता धुर्वे यांनी आपटी गावातील विदारक स्थिती सभागृहासमोर मांडली. “आमच्या गावात पाईपलाईनचे काम गेल्या अनेक दिवसांपासून अर्धवट आहे, रस्ते उखडलेले आहेत आणि दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही सौर ऊर्जा संच (सोलर) बसवण्यात आलेले नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. विशेषतः पावसाळ्यामुळे नुकसान झालेल्या स्मशानभूमीच्या दुरवस्थेचा मुद्दा त्यांनी लावून धरला, जिथे अंत्यसंस्कार करणेही कठीण झाले आहे.

प्रशासकीय पारदर्शकतेवर बोट ठेवताना कविता धुर्वे यांनी विचारले की, “गावागावात होणाऱ्या ग्रामसभा केवळ कागदी घोडे नाचवण्यासाठी आहेत का? सरपंच किंवा महत्त्वाचे लोक उपस्थित नसतानाही ग्रामसेवक इतिवृत्त (प्रोसिडिंग) कसे काय लिहितात?” त्यांच्या या थेट प्रश्नामुळे उपस्थित अधिकाऱ्यांची मोठी कोंडी झाली.

आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत पाणीटंचाईचा प्रश्न गंभीरपणे चर्चिला गेला. अनेक गावांमधील पाणी योजना तांत्रिक कारणांमुळे रखडल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तसेच घरकुल योजनेपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना तात्काळ न्याय देण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.

या सभेचे अध्यक्ष माजी मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, गटविकास अधिकारी केशव पवार, निवासी तहसीलदार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण, चित्तरंजन कोल्हे, डॉ. कुणाल भोयर, छायाताई पिंपरे, उषाताई भोयर यांच्यासह सर्व तालुकास्तरीय प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

आमसभेत उडालेल्या या वैचारिक धुरळ्यानंतर आता प्रशासन खरोखरच ठोस पावले उचलणार की समस्या ‘जैसे थे’ राहणार, याकडे राळेगाव तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!