news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन इमारतीचे काम युद्धपातळीवर! महापौर आणि आयुक्तांकडून प्रगतीचा आढावा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन इमारतीचे काम युद्धपातळीवर! महापौर आणि आयुक्तांकडून प्रगतीचा आढावा

चिंचवड येथील सायन्स पार्कजवळील कामाची महापौरांकडून प्रत्यक्ष पाहणी; दर्जेदार कामाबाबत तडजोड न करण्याचे प्रशासनाला आदेश | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

गुणवत्तेला प्राधान्य देत नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रकल्प वेळेत पूर्ण करा – महापौर रवि लांडगे

 

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १० एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत ही केवळ एक वास्तू नसून नागरिकांना अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि आधुनिक सेवा देणारे केंद्र ठरणार आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता राखत हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करावा. दर्जेदार कामाबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना महापौर रवि लांडगे यांनी प्रशासनाला दिल्या.

चिंचवड येथील सायन्स पार्कजवळ उभारण्यात येत असलेल्या महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामकाजाची महापौर रवि लांडगे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला.

याप्रसंगी नगरसदस्या सुप्रिया चांदगुडे, अनुराधा गोरखे, नगरसदस्य कुशाग्र कदम, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता प्रेरणा सिनकर, अनिल भालसाखळे, कार्यकारी अभियंता संध्या वाघ, बाळू लांडे यांच्यासह विनायक साठे, सुनील पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले की, शहराच्या वाढत्या गरजा आणि लोकसंख्या लक्षात घेऊन ही नवीन इमारत उभारली जात आहे. हे एक तंत्रज्ञानाधारित सेवा केंद्र असेल, जिथे नागरिकांना विविध विभागांच्या सेवा एकाच छताखाली जलद आणि सोयीस्कर पद्धतीने उपलब्ध होतील. त्यामुळे कामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता राखणे अत्यंत आवश्यक आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीच्या कामाबाबत माहिती देताना सांगितले की, प्रकल्पाचे काम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. गुणवत्ता, सुरक्षा आणि वेळेचे नियोजन या तिन्ही आघाड्यांवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून असून सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत. मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी यावेळी कामाच्या सद्यस्थितीचा तांत्रिक अहवाल सादर केला.


“नवीन प्रशासकीय इमारत ही शहराच्या भविष्यातील गरजांचे प्रतीक आहे. नागरिकांना अत्याधुनिक आणि सुसज्ज सुविधा मिळाव्यात, हा आमचा मुख्य उद्देश आहे. प्रशासनाने समन्वयाने काम करत कोणतीही दिरंगाई न करता हा प्रकल्प गुणवत्तापूर्ण पद्धतीने वेळेत पूर्ण करावा.”

— रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!