news
Home पिंपरी चिंचवड आयटीआय धारकांसाठी खुशखबर! पिंपरी-चिंचवड महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा

आयटीआय धारकांसाठी खुशखबर! पिंपरी-चिंचवड महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा

४०७ शिकाऊ उमेदवारांची होणार निवड; २७ एप्रिलपासून मोरवाडी आयटीआयमध्ये कागदपत्र पडताळणी सुरू | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिकेत ४०७ जागांवर शिकाऊ उमेदवारांची भरती; आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, २५ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अस्थायी आस्थापनेवर सन २०२६-२७ या कालावधीसाठी शिकाऊ उमेदवारांची (Trade Apprentice) तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात येणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण विभागामार्फत यासाठीची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, एकूण १२ विविध व्यवसायांच्या ४०७ जागा भरल्या जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेत खालील १२ व्यवसायातील (Trades) उमेदवारांची निवड केली जाईल:

  • कोपा (COPA)

  • वीजतंत्री (Electrician)

  • तारतंत्री (Wireman)

  • रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन (RACT)

  • नळ कारागीर (Plumber)

  • डेस्कटॉप ऑपरेटिंग (DTPO)

  • पंप ऑपरेटर कम मेकॅनिक (POCM)

  • भूमापक (Surveyor)

  • आरेखक स्थापत्य (Draughtsman Civil)

  • मेकॅनिक मोटर व्हेईकल (MMV)

  • इंस्ट्रुमेंट मेकॅनिक (IM)

  • माळी (Gardener)

ज्या विद्यार्थ्यांनी सन २०२३, २०२४ आणि २०२५ मध्ये संबंधित व्यवसायात आयटीआय (ITI) उत्तीर्ण केले आहे, असेच प्रशिक्षणार्थी या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.

  • ऑनलाइन अर्ज: इच्छुक उमेदवारांनी २७ एप्रिल २०२६ ते ६ मे २०२६ या कालावधीत www.apprenticeshipindia.gov.in (NAPS Portal) या संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे.

  • कागदपत्र पडताळणी (Document Verification): ऑनलाइन अर्ज केल्यानंतर उमेदवारांनी २७ एप्रिल २०२६ ते ८ मे २०२६ या कालावधीत मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ‘आय.टी.आय. मोरवाडी’ संस्थेत स्वतः हजर राहणे अनिवार्य आहे.

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी उमेदवार महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला www.pcmcindia.gov.in (मुख्य पृष्ठ — भरती — शिकाऊ उमेदवार नेमणूक सन २०२६-२७) भेट देऊ शकतात. जास्तीत जास्त आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण विभागाचे प्राचार्य यांनी केले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!