news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड प्रशासन कुणाच्या बळीची वाट पाहतंय? महात्मा फुले क्रीडांगणातील उघडी पाण्याची टाकी ठरतेय जीवघेणी

प्रशासन कुणाच्या बळीची वाट पाहतंय? महात्मा फुले क्रीडांगणातील उघडी पाण्याची टाकी ठरतेय जीवघेणी

पिंपरी गावातील महात्मा फुले क्रीडांगणाची दुरवस्था; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी लक्ष घालण्याची जनसेवक सुहास कुदळे यांची मागणी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा गलथान कारभार; उघड्या पाण्याच्या टाकीमुळे खेळाडूंचे आरोग्य धोक्यात

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २६ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे पिंपरी गावातील नागरिकांना आणि खेळाडूंना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पिंपरी गावातील पवनेश्वर मंदिराजवळील महात्मा फुले क्रीडांगणातील पाण्याच्या टाकीला झाकण नसल्याने येथे मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जनसेवक सुहास कुदळे यांनी या गंभीर विषयाकडे महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधले असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

महात्मा फुले क्रीडांगणात पवनेश्वर चहा समोरील भागात महापालिकेची पाण्याची टाकी आहे. मात्र, या टाकीला अनेक दिवसांपासून झाकणच नाही. झाकण नसल्यामुळे या उघड्या टाकीत मच्छर आणि डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे येथे दररोज सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, ही टाकी उघडी असल्याने खेळताना एखादे लहान बालक त्यात पडून जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. महापालिका प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे एखाद्या निरागस बालकाचा बळी जाण्याची वाट आरोग्य विभाग पाहत आहे का? असा संतप्त सवाल सुहास कुदळे यांनी उपस्थित केला आहे.

क्रीडांगण परिसरात साठलेल्या या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरात साथीच्या आजारांचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे आयुक्तांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना कडक सूचना द्याव्यात आणि खालील कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी कुदळे यांनी केली आहे:

१. पाण्याचा टाकीला त्वरित मजबूत झाकण बसवावे.

२. साठलेले दुर्गंधीयुक्त पाणी साफ करून निर्जंतुकीकरण करावे.

३. डास आणि मच्छर होऊ नये म्हणून धूरफवारणी करावी.

“आम्ही सातत्याने लोकांच्या समस्यांसाठी काम करत आलो आहोत आणि करत राहणार. मात्र, प्रशासनाने अशा संवेदनशील विषयांकडे दुर्लक्ष करणे थांबवावे. जर तातडीने कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही जनसेवक सुहास कुदळे यांनी यावेळी दिला.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!