news
पुण्याहून मुंबईकडे जाताना फॉर्च्युनर कारची टेम्पोला भीषण धडक; कारमधील एक जण गंभीर जखमी, तर तिघे सुदैवाने बचावलेसुगम बदली आणि शासकीय लाभ मिळवण्यासाठी बोगस दाखल्यांचा वापर; त्रिसदस्यीय चौकशी समितीच्या अहवालानंतर मोठी कारवाईशिक्षण सुधारणा आणि बेरोजगारीला राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा संकल्प; मुख्य प्रवक्ते सौरव दास, प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यासह कोअर टीमच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णयअभ्यागतांच्या तक्रारी व निवेदने प्रत्यक्ष ऐकून घेत स्थळपाहणी व तातडीने कार्यवाहीचे आदेश; दर गुरुवारी ४ ते ६ नागरिकांसाठी विशेष वेळ राखीवपक्षाची धोरणे जनतेपर्यंत पोहोचवणे आणि विरोधकांच्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्याला मोठी संधी
Home पिंपरी चिंचवड मलेरिया मुक्तीसाठी पिंपरी सज्ज! वायसीएम रुग्णालयाची भव्य प्रभात फेरी

मलेरिया मुक्तीसाठी पिंपरी सज्ज! वायसीएम रुग्णालयाची भव्य प्रभात फेरी

डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली 'कोरडा दिवस' पाळण्याचे आवाहन; विद्यार्थ्यांचा उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘डंख छोटा, धोका मोठा!’; जागतिक हिवताप दिनानिमित्त वायसीएम रुग्णालयामार्फत प्रभात फेरी व जनजागृती

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, २७ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: जागतिक हिवताप दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पदव्युत्तर संस्था व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (वायसीएम) वतीने रविवारी संत तुकाराम नगर परिसरात भव्य प्रभात फेरी काढण्यात आली. “हिवताप निर्मूलनासाठी कटिबद्ध – आता हे शक्य आहे, आता हे केलेच पाहिजे!” या जागतिक आरोग्य संघटनेच्या घोषवाक्याचा प्रसार करत नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली.

या प्रभात फेरीच्या माध्यमातून हिवताप (मलेरिया) प्रतिबंध, नियंत्रण आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. “कोरडा दिवस पाळा, हिवताप टाळा”, “घराभोवती पाणी साठू देऊ नका” आणि “मच्छरदाणीचा वापर करा” अशा घोषणा देत विद्यार्थी आणि डॉक्टरांनी परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

सदर उपक्रम पदव्युत्तर संस्था व वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे आणि जनआरोग्य वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. हर्षल पांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सहयोगी प्राध्यापक डॉ. मुकेश बावा, सहाय्यक प्राध्यापक सॅमसन लिओ यू, आरोग्य सहाय्यक माणिक चव्हाण यांच्यासह निवासी डॉक्टर, परिचर्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिवताप हा मादी ॲनोफिलीस डासाच्या चाव्याने पसरणारा आजार असून, त्याची लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रमुख लक्षणे:
  • सतत किंवा थंडी वाजून येणारा ताप.

  • तीव्र डोकेदुखी आणि अंगदुखी.

  • मळमळ, उलट्या होणे आणि प्रचंड अशक्तपणा जाणवणे.

  • अचानक घाम येणे.

प्रतिबंधात्मक उपाय:
  • घराच्या परिसरात कोठेही पाणी साचू देऊ नका.

  • आठवड्यातून किमान एक दिवस ‘कोरडा दिवस’ म्हणून पाळावा.

  • झोपताना मच्छरदाणीचा वापर करा आणि पूर्ण अंग झाकणारे कपडे परिधान करा.

  • खिडक्यांना जाळ्या बसवा आणि परिसर स्वच्छ ठेवा.

महानगरपालिकेच्या वतीने हिवताप नियंत्रणासाठी प्रभावी पावले उचलली जात असून, नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!