पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी पिंपरी पालिकेची मोठी तयारी; नियंत्रण व नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, २७ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पावसाळ्यात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्ती आणि पूरस्थितीचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत मिळावी यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर नियंत्रण अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश आज जारी केले आहेत.
या नियोजनानुसार, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी उपआयुक्त पदावरील अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून, तर अतिरिक्त आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई आणि इतर प्रतिबंधात्मक कामे वेळेत पूर्ण करून घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पूरनियंत्रण आराखड्यानुसार स्थापत्य, पाणीपुरवठा, आरोग्य, अग्निशमन, वैद्यकीय आणि विद्युत विभागाशी समन्वय साधून आपत्कालीन सेवा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
क्षेत्रीय कार्यालयानिहाय नियंत्रण अधिकारी (अतिरिक्त आयुक्त):
| नियंत्रण अधिकारी | संबंधित क्षेत्रीय कार्यालय | संपर्क क्रमांक |
| अतिरिक्त आयुक्त (१) | अ, ब, क | ९२७१०५७१०१ |
| अतिरिक्त आयुक्त (२) | ड, इ | ९८९२९८६०९५ |
| अतिरिक्त आयुक्त (३) | फ, ग, ह | ८६००११२३१३ |
क्षेत्रीय कार्यालयानिहाय नियुक्त नोडल अधिकारी (उपआयुक्त):
| नोडल अधिकारी | क्षेत्रीय कार्यालय | संपर्क क्रमांक |
| ममता शिंदे | अ क्षेत्रीय कार्यालय | ८४५९५३१५२० |
| राजेश आगळे | ब क्षेत्रीय कार्यालय | ९५५२५११९७२ |
| अण्णा बोदडे | क क्षेत्रीय कार्यालय | ९९२२५०१९४२ |
| सिताराम बहुरे | ड क्षेत्रीय कार्यालय | ९९२३९८९७७४ |
| पंकज पाटील | इ क्षेत्रीय कार्यालय | ८३८०८१७८०६ |
| संदीप खोत | फ क्षेत्रीय कार्यालय | ७७२२०६०९२६ |
| चेतना केरुरे | ग क्षेत्रीय कार्यालय | ९४२०४८४८३१ |
| व्यंकटेश दुर्वास | ह क्षेत्रीय कार्यालय | ७७४४०००६६८ |
शहरात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण करणे आणि जीवितहानी टाळणे हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील या अधिकृत क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
