news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड माता रमाई सृष्टी प्रकल्पासाठी २२ वर्षांचा संघर्ष फळाला! अण्णा बनसोडे यांनी घेतला तयारीचा आढावा

माता रमाई सृष्टी प्रकल्पासाठी २२ वर्षांचा संघर्ष फळाला! अण्णा बनसोडे यांनी घेतला तयारीचा आढावा

माता रमाई स्मारकाच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या उपाध्यक्षांकडून पाहणी व आढावा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला हेवा वाटेल असे स्मारक उभारू – अण्णा बनसोडे

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २७ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “पिंपरी येथे उभारण्यात येत असलेला त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर सृष्टी प्रकल्प हा शहरातील आंबेडकरी जनतेच्या तब्बल २२ वर्षांच्या संघर्षलढ्याचे मोठे यश आहे. केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण भारताला हेवा वाटेल असे भव्य आणि प्रेरणादायी स्मारक याठिकाणी उभारले जाईल,” असे प्रतिपादन राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले.

माता रमाई भीमराव आंबेडकर सृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन मंगळवारी (२८ एप्रिल) होत आहे. या पार्श्वभूमीवर अण्णा बनसोडे यांनी आज प्रत्यक्ष स्मारकस्थळाला भेट देऊन कामाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, सह शहर अभियंता मनोज सेठीया, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि कार्यकारी अभियंता विजय जाधव उपस्थित होते.

पाहणी दरम्यान बनसोडे म्हणाले की, “हे स्मारक म्हणजे आंबेडकरी चळवळीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. माता रमाईंचा त्याग आणि त्यातून उभे राहिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्व याचे प्रभावी दर्शन या स्मारकातून घडेल. हा प्रकल्प दर्जेदार होण्यासाठी आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि कामात कोणतीही उणीव राहू दिली जाणार नाही.” हे स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पिंपरी चौकात सुमारे २४९८.९७ चौरस मीटर क्षेत्रावर साकारणाऱ्या या प्रकल्पासाठी २४ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या स्मारकाचे वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे असतील:

  • आरसीसी स्ट्रक्चर व म्युरल्स: मजबूत बांधकाम आणि कलात्मक म्युरल्सद्वारे माता रमाईंच्या जीवनातील प्रसंग साकारले जातील.

  • आधुनिक सोयीसुविधा: लँडस्केप गार्डन, कारंजे, आकर्षक प्रवेश कमान आणि संपूर्ण परिसरात अत्याधुनिक रोषणाई.

  • डिजिटल अनुभव: क्युआर कोड आणि बहुभाषिक ऑडिओ प्रणालीमुळे नागरिकांना डिजिटल स्वरूपात माहिती उपलब्ध होईल.

  • समावेशकता: दिव्यांगांसाठी रॅम्प, लिफ्ट आणि नागरिकांच्या सोयीसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व बसण्याची व्यवस्था.

अण्णा बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्मारकाचे काम नियोजनबद्ध आणि उच्च दर्जाचे राखण्याचे निर्देश दिले आहेत. या स्मारकाच्या उभारणीमुळे शहराच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर पडणार आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!