news
रहाटणीत आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह! आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज उद्यानात सामूहिक योगसाधनापिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्तपुर्णा नगरमध्ये वाळलेल्या झाडांमुळे मृत्यूची टांगती तलवार; वारंवार तक्रार करूनही मनपा उद्यान विभागाचे ‘डोळेझाक’!पिंपळे सौदागरच्या लिनिअर गार्डनमध्ये रंगला भक्ती आणि योगाचा अनोखा संगम! ‘द आर्ट ऑफ लिविंग’ आणि भाजपचा संयुक्त उपक्रमरहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुल
Home पिंपरी चिंचवड पिंपरी मनपाच्या विकासकामांचा मंत्रालयातून आढावा; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे महत्त्वाचे निर्देश

पिंपरी मनपाच्या विकासकामांचा मंत्रालयातून आढावा; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे महत्त्वाचे निर्देश

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विकासकामांचा सविस्तर आढावा; गुणवत्ता आणि पारदर्शकतेवर भर | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

शहरातील सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करून नागरिकांना मूलभूत सुविधा द्या – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , २८ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “पिंपरी चिंचवड शहराच्या विकासकामांमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महापालिका, पीएमआरडीए आणि पीएमपीएल यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करावीत आणि नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून द्याव्यात,” असे निर्देश राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात शहरातील विविध महत्त्वाच्या विकासकामांची आढावा बैठक सोमवारी पार पडली. यावेळी राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या.

बैठकीत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे पाणीपुरवठा (अमृत २.०), घनकचरा व्यवस्थापन, रस्ते विकास, मेट्रो वाहतूक, प्रधानमंत्री आवास योजना, नदी सुधार प्रकल्प आणि चापेकर वाडा यांसारख्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. राज्यमंत्री मिसाळ यांनी प्रत्येक प्रकल्पाची सद्यस्थिती, कामाचा वेग आणि तांत्रिक अडचणींचा सविस्तर आढावा घेऊन गृहनिर्माण प्रकल्पातील लाभार्थ्यांना वेळेत घरे देण्याचे आदेश दिले.

  • आमदार महेश लांडगे: इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी उगमस्थानापासून एसटीपी प्रकल्प राबवावा. तसेच चिखली-घरकुल प्रकल्पातील सुविधांच्या अभावामुळे तेथील सदनिकाधारकांचा आतापर्यंतचा मिळकत कर माफ करावा.

  • आमदार शंकर जगताप: मेट्रो प्रकल्पाला गती द्यावी, रेड झोन पॉलिसी कार्यान्वित करावी आणि शहराच्या भविष्यातील पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पासाठी पुढाकार घ्यावा.

  • आमदार अमित गोरखे व उमा खापरे: सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांमध्ये दर्जेदार मूलभूत सुविधा द्याव्यात आणि पाणीपुरवठ्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा.

या बैठकीस महापौर रवी लांडगे, विधान परिषद सदस्य उमा खापरे, अमित गोरखे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आणि महापालिकेचे विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर आभार महापौर रवी लांडगे यांनी मानले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!