news
दिल्ली मतदार यादी पुनरीक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात; बाधित मतदारांची नावे आणि कारणे सार्वजनिक करण्याचे आवाहन!‘नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध’; स्थायी समिती बैठकीत सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन!‘शिक्षकांमुळेच महापालिका शाळांकडे पालकांचा कल वाढला’; प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान!‘शहराच्या नियोजनबद्ध विकासात पालिकेच्या अभियंत्यांचे योगदान अद्वितीय’; महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!‘अभिजात मराठी भाषा सप्ताह ही लोकचळवळ व्हावी’; पिंपरी महापालिकेच्या नियोजन बैठकीत महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!
Home पिंपरी चिंचवड अजितदादांच्या एका आदेशाने माता रमाई स्मारकाचा मार्ग झाला मोकळा! मारुती भापकर यांनी सांगितला पंधरा वर्षांच्या संघर्षाचा प्रवास

अजितदादांच्या एका आदेशाने माता रमाई स्मारकाचा मार्ग झाला मोकळा! मारुती भापकर यांनी सांगितला पंधरा वर्षांच्या संघर्षाचा प्रवास

PMPL प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणातून जागा मिळवण्यासाठी दादांनी दिले होते स्पष्ट आदेश; कार्यकर्त्यांच्या संघर्षाचा विजय | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

माता रमाई स्मारकासाठी दिवंगत अजितदादा पवार यांचे योगदान ऐतिहासिक; मारुती भापकर यांनी जागवल्या आठवणी

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, २९ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टी लगतच्या त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले. या ऐतिहासिक क्षणाच्या पार्श्वभूमीवर, स्मारकासाठीची जागा मिळवून देण्यात आणि प्रशासकीय अडथळे दूर करण्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे, अशा भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी व्यक्त केल्या.

मागील पंधरा वर्षांपासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते पिंपरी येथील PMPL ची आरक्षित २३ गुंठे जागा माता रमाई स्मारकासाठी मिळावी, यासाठी संघर्ष करत होते. महापालिका प्रशासन सकारात्मक असूनही PMPL प्रशासन ही जागा देण्यास तयार नव्हते. अगदी लेखी पत्राद्वारेही PMPL ने ही जागा देता येणार नाही, असे कळवले होते. दरम्यानच्या काळात सध्याच्या भीमसृष्टीमध्येच पुतळा बसवण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून मांडला गेला, मात्र आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण स्वतंत्र जागेच्या मागणीसाठी तो फेटाळून लावला.

मारुती भापकर यांनी या संघर्षातील एक थरारक आठवण सांगितली. ते म्हणाले, “आम्ही शिष्टमंडळासह स्वारगेट येथील PMPL कार्यालयात तत्कालीन संचालिका दीपा मुंडे यांना भेटण्यास गेलो होतो. त्यांनी अत्यंत उर्मटपणे जागा देण्यास नकार दिला. त्यावेळी आम्ही दिवंगत अजितदादा पवार यांनी या जागेबाबत जाहीर कार्यक्रमात घेतलेल्या भूमिकेची ऑडिओ रेकॉर्डिंग त्यांच्या टेबलावर मोठ्या आवाजात वाजवली. दादांची ती स्पष्ट भूमिका ऐकताच, मघाशी ताठर भूमिका घेणाऱ्या मुंडे मॅडम नरमल्या आणि त्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी दर्शवली.”

या विषयानंतर अजितदादांनी कार्यकर्त्यांना पहाटे ६ वाजता पुण्याच्या शासकीय कार्यालयात भेटीसाठी बोलावले होते. भापकर पुढे म्हणाले, “आम्ही पहाटे तिथे पोहोचलो, तेव्हा आयुक्त शेखर सिंह आणि प्रशासकीय अधिकारी तिथे हजर होते. दादांनी त्या बैठकीत कोणत्याही तांत्रिक अडचणी न काढता ही जागा तातडीने महापालिकेकडे वर्ग करण्याचे स्पष्ट आदेश दिले. ‘शासनाची अडचण आली तर मी आहे, पण स्मारक भव्यच झाले पाहिजे’ असे शब्द दादांनी उच्चारले आणि या कामाचा मार्ग मोकळा झाला.”

बाबासाहेबांच्या महान कार्यामागे माता रमाईंचा हिमालयासारखा त्याग होता. आज साकारत असलेले हे स्मारक म्हणजे त्याच त्यागाचा आणि पंधरा वर्षे लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संघर्षाचा विजय आहे. या स्मारकाचे काम पारदर्शक आणि दर्जेदार पद्धतीने वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन मारुती भापकर यांनी यावेळी केले.

या ऐतिहासिक कामासाठी ज्या-ज्या कार्यकर्त्यांनी उपोषणे केली, मोर्चे काढले आणि कष्ट घेतले, त्या सर्वांचे भापकर यांनी मनापासून अभिनंदन केले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!