news
नवीन सर्वसमावेशक ‘पार्किंग धोरण’ मंजूर; रस्त्यांवरील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी टेलिस्कोपिक पार्किंग शुल्क व पास प्रणाली लागू होणारअतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती; पिंपरी-चिंचवडची ‘स्पोर्ट्स सिटी’ म्हणून ओळख होणार अधिक दृढवडोदरा येथील ऐतिहासिक सोहळ्यात श्लोक पठण करून केला जागतिक विक्रम; पूज्य कोठारी स्वामींच्या हस्ते अधिकृत प्रमाणपत्र प्रदानमुलांची बंद केलेली शिष्यवृत्ती सुरू करा, वस्तूऐवजी थेट ‘डीबीटी’ (DBT) द्वारे बँक खाताप लाभ द्या आणि चार अन्यायकारक श्रम संहिता रद्द करा; कामगार संघटना आक्रमकगणेशोत्सवातील कार्यकर्त्यांचा वेळ, श्रम आणि आर्थिक भार वाचवण्यासाठी नगरसेविका रिटा सानप आक्रमक
Home पिंपरी चिंचवड थेरगावच्या जयदेव म्हमाणेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णवेध! महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते खेळाडूंचा विशेष सन्मान

थेरगावच्या जयदेव म्हमाणेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णवेध! महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते खेळाडूंचा विशेष सन्मान

किंग मार्शल आर्ट्स संस्थेच्या खेळाडूंचा महापौर कार्यालयात गौरव; आंतरराष्ट्रीय स्तरावर पिंपरी-चिंचवडचा झेंडा उंचावल्याबद्दल कौतुक | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी चिंचवड क्रीडा क्षेत्रातही देशाला दिशा देणारे शहर ठरतेय – महापौर रवि लांडगे

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १२ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “पिंपरी चिंचवड हे केवळ औद्योगिक शहर नसून क्रीडा क्षेत्रातही देशाला दिशा देणारे शहर बनत आहे. आपल्या शहरातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवत आहेत, ही बाब प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी आहे. अशा गुणवंत खेळाडूंच्या पाठीशी महापालिका प्रशासन कायम ठामपणे उभी राहील,” असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या किंग मार्शल आर्ट्स संस्थेच्या विद्यार्थ्यांचा महापौर कार्यालयात महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे नुकत्याच झालेल्या ‘इंडियन इंटरग्रील चॅम्पियन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत’ भारताचे प्रतिनिधित्व करताना थेरगाव येथील चार खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. यामध्ये जयदेव म्हमाणे यांनी सुवर्णपदक पटकावून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. जयदेव यांनी आतापर्यंत तब्बल ११ सुवर्णपदके जिंकून आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीची छाप पाडली आहे. त्यांच्या या यशाची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे.

याप्रसंगी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे म्हणाले की, “खेळाडूंचे यश हे संपूर्ण शहराचा सन्मान असतो. कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर पिंपरी चिंचवडचे नाव पोहोचवले आहे. भविष्यात अशा खेळाडूंना अधिक प्रोत्साहन आणि अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.”

या गौरव सोहळ्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव जाधव यांच्यासह अनेक क्रीडाप्रेमी उपस्थित होते. महापौरांनी सर्व विजयी खेळाडूंचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!