news
नवीन सर्वसमावेशक ‘पार्किंग धोरण’ मंजूर; रस्त्यांवरील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी टेलिस्कोपिक पार्किंग शुल्क व पास प्रणाली लागू होणारअतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती; पिंपरी-चिंचवडची ‘स्पोर्ट्स सिटी’ म्हणून ओळख होणार अधिक दृढवडोदरा येथील ऐतिहासिक सोहळ्यात श्लोक पठण करून केला जागतिक विक्रम; पूज्य कोठारी स्वामींच्या हस्ते अधिकृत प्रमाणपत्र प्रदानमुलांची बंद केलेली शिष्यवृत्ती सुरू करा, वस्तूऐवजी थेट ‘डीबीटी’ (DBT) द्वारे बँक खाताप लाभ द्या आणि चार अन्यायकारक श्रम संहिता रद्द करा; कामगार संघटना आक्रमकगणेशोत्सवातील कार्यकर्त्यांचा वेळ, श्रम आणि आर्थिक भार वाचवण्यासाठी नगरसेविका रिटा सानप आक्रमक
Home पिंपरी चिंचवड चिंचवडमध्ये शंभूचरित्राचा जागर! ‘शिवरूद्र शंभुराजे’ महानाट्याने शहरवासीयांचे डोळे दिपले

चिंचवडमध्ये शंभूचरित्राचा जागर! ‘शिवरूद्र शंभुराजे’ महानाट्याने शहरवासीयांचे डोळे दिपले

बर्ड व्हॅली उद्यानात महानाट्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद; १४ मे रोजी नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘शिवरूद्र शंभुराजे’ महानाट्य हे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोहोचविणारा स्तुत्य उपक्रम – आमदार अमित गोरखे

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, १२ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, पराक्रम आणि स्वराज्यासाठीचे योगदान युवा पिढीला जिवंत स्वरूपात अनुभवता यावे, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आयोजित केलेले महानाट्य हा एक स्तुत्य उपक्रम आहे. प्रत्येकाने आपल्या परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांना हे महानाट्य पाहण्यासाठी प्रोत्साहित करावे,” असे आवाहन आमदार अमित गोरखे यांनी केले.

चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यान येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘विचार प्रबोधन पर्वा’त ‘शिवरूद्र शंभुराजे’ या भव्य महानाट्याच्या दुसऱ्या प्रयोगाप्रसंगी ते बोलत होते.

‘शिवस्पर्श शिवसह्याद्री प्रतिष्ठान’ निर्मित हे महानाट्य ॲड. विनय चंद्रकांत दाभाडे यांनी लिखित व दिग्दर्शित केले आहे. या महानाट्याची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

 तीन मजली भव्य रंगमंच आणि थरारक लढाईचे प्रसंग, २०० हून अधिक कलाकारांचा सहभाग,  हे महानाट्य ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ होल्डर आहे.

१३ मे पर्यंत सायंकाळी ७ ते १० या वेळेत शिवशंभो उद्यानासमोर (बर्ड व्हॅलीच्या मागे) हे प्रयोग रंगणार आहेत.

यावेळी नगरसदस्य तुषार हिंगे, कुशाग्र कदम, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, उप आयुक्त अण्णा बोदडे यांसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी (१४ मे) महापालिकेच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका मुख्य इमारत व १०:४५ वाजता बर्ड व्हॅली येथील पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते अभिवादन,  शिवशाहीर सुरेश सुर्यवंशी आसंगीकर यांचा शाहीरीचा कार्यक्रम, सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे “छत्रपती संभाजी महाराज-एक अद्वितीय योध्दे” या विषयावर व्याख्यान

या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना शहरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महापौर रवि लांडगे आणि आमदार अमित गोरखे यांनी केले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!