news
लोणावळ्यात घुमला ‘शतप्रतिशत भाजपा’चा नारा! पिंपरी-चिंचवड भाजपच्या निवासी प्रशिक्षण वर्गात दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शनपिंपरीच्या राजकारणात मोठा भूकंप! “महेश लांडगे यांना आमदार करण्यात माझाच वाटा”, माजी महापौर मंगला कदम यांची जाहीर कबुलीकामगार नगरीत श्रमिकांचा महाकुंभ! आमदार महेशदादा लांडगे यांच्या उपस्थितीत चिंचवडमध्ये हजारो कामगारांचे शक्तीप्रदर्शनरांजणगावात थरार! पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकावर दोन राऊंड फायर; पोलिसांचेही प्रत्युत्तरादाखल ४ राऊंडपिंपरी पालिकेचे महाप्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन सरसावले! अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
Home पिंपरी चिंचवड रांजणगावात थरार! पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकावर दोन राऊंड फायर; पोलिसांचेही प्रत्युत्तरादाखल ४ राऊंड

रांजणगावात थरार! पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकावर दोन राऊंड फायर; पोलिसांचेही प्रत्युत्तरादाखल ४ राऊंड

दिघीतील गोळीबाराच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी शेखर जाधव आणि त्याच्या साथीदाराचा पोलिसांवर हल्ला; ऊसाच्या शेताचा फायदा घेत आरोपी पसार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकावर गोळीबार; रांजणगावजवळ पोलिसांची फिल्मी स्टाईल चकमक

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १८ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकावर (Property Crime Cell) आरोपींनी दोन राऊंड गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोळीबाराच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीचा माग काढत गेलेल्या पोलीस पथकावर हा हल्ला झाला. स्वतःच्या संरक्षणासाठी पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल चार राऊंड फायर केले. हा थरार पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील रांजणगावजवळील सोनी सांगवी गावातील हॉटेल यशराज समोर घडला. या चकमकीत आरोपी जखमी झाल्याची शक्यता असून, ऊसाच्या शेताचा फायदा घेत ते पसार झाले आहेत.

१३ मे २०२६ रोजी दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इसमावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा (रजिस्टर नंबर २१५/२०२६) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास मालमत्ता गुन्हे विरोधी पथक करत असताना, तांत्रिक विश्लेषणाद्वारे मुख्य आरोपी शेखर संभाजी जाधव (रेकॉर्डवरील गुन्हेगार) हा त्याच्या एका अनोळखी साथीदारासह रांजणगाव परिसरात असल्याची माहिती मिळाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोराक्षनाथ बालवडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मेडगे, पोलीस हवालदार प्रवीण कांबळे, विशाल गायकवाड, पोलीस शिपाई विनोद वीर, गणेश सावंत आणि गुंडा विरोधी पथकाचे कर्मचारी खाजगी वाहनाने रांजणगाव येथे पोहोचले. ते स्थानिक पोलिसांची मदत घेण्यासाठी जात असतानाच, त्यांना आरोपी शेखर जाधव आणि त्याचा साथीदार रस्त्याच्या कडेला दुचाकीसह उभे असलेले दिसले.

पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच आरोपींनी स्प्लेंडर मोटारसायकलवरून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग सुरू केला असता, शेखर जाधवच्या सांगण्यावरून त्याच्या साथीदाराने २ ते ३ वेळा पोलिसांना पिस्तूल दाखवून “पाठलाग करू नका” असा इशारा दिला.

सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास रांजणगाव जवळील सोनी सांगवी येथील ‘हॉटेल यशराज’ जवळ आल्यावर आरोपींनी आपली टू-व्हीलर रस्त्याच्या कडेला सोडून दिली आणि शेजारीच असलेल्या ऊसाच्या शेतात पळू लागले. पोलीस पथकही त्यांच्या मागे ऊसाच्या शेतात शिरले.

ऊसाच्या शेतात जात असतानाच आरोपी शेखर जाधव याने त्याच्या साथीदाराला “या पोलिसांना ठोक” अशी चिथावणी दिली. यावरून त्या अनोळखी साथीदाराने पोलीस पथकाच्या दिशेने थेट दोन राऊंड फायर केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे स्वतःच्या आणि पथकाच्या संरक्षणासाठी स.पो.नि. बालवडकर यांनी आपल्या सरकारी पिस्तूलमधून आरोपींच्या दिशेने चार राऊंड फायर केले. या प्रतिहल्ल्यात आरोपी जखमी झाल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र, ऊसाच्या पिकाचा फायदा घेऊन दोन्ही आरोपी अंधारात पसार झाले.

या गोळीबाराच्या गंभीर घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची विविध पथके आणि पुणे ग्रामीणची स्थानिक पोलीस पथके ऊसाच्या शेतात व परिसरात आरोपींचा कसून शोध घेत आहेत. याप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात आरोपी शेखर संभाजी जाधव आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा (रजिस्टर नंबर २१६/२०२६) भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, १३२, ३(५) आणि शस्त्र अधिनियम (Arms Act) कलम ३, २५ तसेच क्रिमिनल लॉ अमेडमेंट ॲक्टनुसार सरकारी कामात अडथळा आणणे आणि पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!