news
पिंपरी-चिंचवड महापालिका वारीसाठी सज्ज! महापौर रवी लांडगे यांच्याकडून पालखी मार्गाची पाहणी; संवेदनशील भागात उभारणार ‘वॉच टॉवर’पीसीएमसी मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात ‘ॲक्शन मोड’मध्ये! ३५ हजार आसामींना नोटीस; ऑनलाइन भरणा केल्यास ४ टक्के सवलतपिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा ड्रग्जमाफियांना मोठा दणका! १५६ गुन्ह्यांतील कोट्यवधींचा अंमली पदार्थांचा साठा जाळून केला खाकपिंपरी-चिंचवडमध्ये बिल्डरांची मुजोरी! जाधववाडीत ‘संकेश्वर कॅपिटल’ची भिंत कोसळल्याने नागरिक गंभीर जखमी; संतप्त जमावाकडून वाहनांची तोडफोड!फळबागायतदारांसाठी मोठी बातमी! मृग बहार फळपीक विम्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; जाणून घ्या अंतिम तारखा आणि प्रति हेक्टर हप्ता
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड मनपात अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाची पूर्वतयारी बैठक; महापौर रवी लांडगे यांच्याकडून लोकसहभागाचे आवाहन!

पिंपरी-चिंचवड मनपात अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाची पूर्वतयारी बैठक; महापौर रवी लांडगे यांच्याकडून लोकसहभागाचे आवाहन!

नवनियुक्त अध्यक्ष गणेश अवघडे यांचा सन्मान; प्रशांत शितोळे, भाऊसाहेब भोईर आणि विविध सामाजिक संघटनांच्या उपस्थितीत शैक्षणिक व पारंपरिक कला महोत्सवाचे नियोजन | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६’ भव्य आणि समाजप्रबोधनपर होणार; नियोजन बैठकीत विविध सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधींच्या मागण्यांवर चर्चा

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ३ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरे केले जाणारे ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६’ यंदा अधिक भव्य, दिव्य आणि लोकसहभागातून साजरे करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. या महोत्सवाच्या पूर्वतयारी व नियोजनासाठी महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत एक उच्चस्तरीय आणि महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि संघटनांच्या वतीने प्रबोधन पर्वाच्या स्वरूपाबाबत अनेक विधायक सूचना व मागण्या मांडण्यात आल्या.

या बैठकीचे मुख्य औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती २०२६ च्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झालेले सामाजिक कार्यकर्ते गणेश अवघडे यांचा महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी अवघडे यांचे हार्दिक अभिनंदन केले आणि आगामी विचार प्रबोधन पर्व सर्व घटकांना एकत्र घेऊन यशस्वी करण्याचे आवाहन केले.

या व्यापक नियोजन बैठकीस शहरातील अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि विविध सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, कला, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, मधुरा शिंदे, नगरसदस्य व प्रतोद जितेंद्र ननावरे, तानाजी बारणे, धर्मपाल तंतरपाळे, बापू घोलप, माजी नगरसदस्य काळूराम पवार, कमल घोलप आणि भगवान शिंदे, महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे आणि ‘अ’ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, भाऊसाहेब अडागळे, संदीपान झोंबाडे, मनोज तोरडमल, सतीश भवाळ, संजय ससाणे, अरुण जोगदंड, नितीन घोलप, युवराज दाखले, चंद्रकांत लोंढे, आशाताई शहाणे, शशिकांत आढाव, मंगेश गायकवाड, अनिल शिंदे, श्रीमंत सावंत, अरुण डोंगरे, नागेश थोरात, गिरीश धोत्रे, तेजश्री शिंदे, श्रद्धेश, नामदेव शिंदे, सुरेश बोराडे, बाळासाहेब वंजुळे, मंगेश डगवारे, दीपाली एस. लोंढे, माया कैलास चौधरी, शिवाजी चव्हाण, किरण कांबळे, कृष्णा साबळे, अनिल सोनवणे, कैलास पवार, विवेक ननावरे, शामा जगनाथ, गणेशी हरिश्चंद्र, प्रकाश जगन्नाथ, प्रसाद केसरे, आनंद कांबळे, विशाल कसबे, अनिता कांबळे, गणेश मोरे, सविता आढळे, अर्चना सोनवणे, रवींद्र वाघमारे, मयूर ढोले, शंकर खवळे, संजय बावणे आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीदरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारक विचारांचा प्रसार शेवटच्या घटकापर्यंत करण्यासाठी महत्त्वपूर्ण मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. १. प्रबोधन पर्वात केवळ मनोरंजनात्मक कार्यक्रम न ठेवता शैक्षणिक आणि वैचारिक कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे. विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करावे, तसेच तरुण पिढीला अण्णाभाऊंच्या संघर्षाची माहिती देण्यासाठी विशेष प्रेरणादायी व्याख्याने आयोजित करावीत. २. निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मुख्य स्मारक परिसरातील सर्व अतिक्रमणे तातडीने हटवून तिथे चोख सुशोभीकरण करावे आणि येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ३. ७ जुलै रोजी शहरात येणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या दरम्यान स्मारकाजवळ वारकऱ्यांसाठी उत्तम व्यवस्था आणि स्वागत कक्ष उभारण्याचे नियोजन करावे. ४. अण्णाभाऊ साठे यांनी तळागाळातील शाहिरी आणि लोककलेला जिवंत ठेवले, त्यामुळे या प्रबोधन पर्वात शाहिरी, पोवाडे, भारुड यांसारख्या पारंपरिक लोककलेचा विशेष महोत्सव भरवावा आणि पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक कलाकारांना मुख्य व्यासपीठावर सादरीकरणाची संधी द्यावी. ५. प्रबोधन पर्वाच्या अंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात यावे आणि केवळ झाडे न लावता त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन करून त्या ठिकाणी माहिती फलक लावण्यात यावेत.

बैठकीच्या समारोपप्रसंगी उपस्थितांना आश्वस्त करताना महापौर रवी लांडगे म्हणाले, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार हे संपूर्ण समाजाला दिशा देणारे आहेत. आजच्या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सर्व विधायक सूचना व मागण्यांचा प्रशासन सकारात्मकतेने विचार करेल. यंदाचे विचार प्रबोधन पर्व अत्यंत भव्य, दिव्य आणि खऱ्या अर्थाने समाजप्रबोधन करणारे ठरेल, यादृष्टीने महापालिका प्रशासन आवश्यक ती सर्व कार्यवाही तात्काळ सुरू करेल.”

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!