news
पिंपरी-चिंचवड महापालिका वारीसाठी सज्ज! महापौर रवी लांडगे यांच्याकडून पालखी मार्गाची पाहणी; संवेदनशील भागात उभारणार ‘वॉच टॉवर’पीसीएमसी मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात ‘ॲक्शन मोड’मध्ये! ३५ हजार आसामींना नोटीस; ऑनलाइन भरणा केल्यास ४ टक्के सवलतपिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा ड्रग्जमाफियांना मोठा दणका! १५६ गुन्ह्यांतील कोट्यवधींचा अंमली पदार्थांचा साठा जाळून केला खाकपिंपरी-चिंचवडमध्ये बिल्डरांची मुजोरी! जाधववाडीत ‘संकेश्वर कॅपिटल’ची भिंत कोसळल्याने नागरिक गंभीर जखमी; संतप्त जमावाकडून वाहनांची तोडफोड!फळबागायतदारांसाठी मोठी बातमी! मृग बहार फळपीक विम्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; जाणून घ्या अंतिम तारखा आणि प्रति हेक्टर हप्ता
Home पिंपरी चिंचवड बंजारा समाजाच्या हक्काच्या व्यासपीठासाठी ‘गोरसेना’ आक्रमक; पिंपरी-चिंचवडमध्ये ‘बंजारा भवन’ उभारण्यासाठी महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना साकडे!

बंजारा समाजाच्या हक्काच्या व्यासपीठासाठी ‘गोरसेना’ आक्रमक; पिंपरी-चिंचवडमध्ये ‘बंजारा भवन’ उभारण्यासाठी महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना साकडे!

नितीन किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाचे निवेदन; चिंचवड सायन्स पार्कला हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची आग्रही मागणी | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘बंजारा भवन’ उभारण्याची आणि सायन्स पार्कला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची आग्रही मागणी; ‘गोरसेना’चे महापौर व आयुक्तांना निवेदन

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, ३ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या लाखो बंजारा बांधवांना सांस्कृतिक व सामाजिक उत्सव एकत्र साजरे करण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी, याकरिता शहरात भव्य ‘बंजारा भवन’ (समाज मंदिर) उभारण्यात यावे, तसेच चिंचवड येथील सायन्स पार्कला (Science Park) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते महानायक स्व. वसंतराव नाईक साहेब यांचे नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी ‘गोरसेना’ संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भातील मागण्यांचे सविस्तर निवेदन गोरसेना पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नितीन किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य प्रशासक तथा महापौर रवी लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना प्रत्यक्ष भेटून सादर केले. यावेळी महापालिकेचे जनता संपर्क अधिकारी (PRO) प्रफुल्ल पुराणिक देखील उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात बंजारा समाज हा लाखोच्या संख्येने वास्तव्यास आहे. रोजगार, मजुरी आणि विविध लहान-मोठ्या व्यवसायांच्या निमित्ताने शहरात आलेल्या या समाजाच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. बंजारा समाज हा आपली गौरवशाली संस्कृती आणि परंपरा अत्यंत जिवंत ठेवणारा समाज आहे. दरवर्षी समाजातर्फे होळी, तीज महोत्सव, संत सेवालाल महाराज जयंती आणि महानायक स्व. वसंतरावजी नाईक साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

मात्र, शहरात समाजासाठी हक्काचे कोणतेही सांस्कृतिक केंद्र नसल्याने बंजारा बांधवांना हे सण गल्लीबोळात किंवा मिळेल त्या मोकळ्या जागेत साजरे करावे लागतात. ही मोठी गैरसोय दूर करण्यासाठी महापालिकेने शहरात किंवा उद्यान परिसरात जागा आरक्षित करून त्वरित ‘बंजारा भवन’ किंवा समाज मंदिर उभारण्याचा ठराव मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

शिष्टमंडळाने चिंचवड येथील प्रसिद्ध सायन्स पार्कला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची मागणी अत्यंत लावून धरली आहे. विज्ञान आणि कृषी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हे नाव देणे अत्यंत सार्थ ठरेल, असे निवेदनात नमूद आहे.

महानायक वसंतराव नाईक यांचे ऐतिहासिक कार्य:

स्व. वसंतराव नाईक हे महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काळ (११ वर्षांहून अधिक) मुख्यमंत्री राहिलेले अद्वितीय नेतृत्व होते. त्यांना महाराष्ट्रातील ‘हरितक्रांतीचे प्रणेते’ (Father of Green Revolution in Maharashtra) मानले जाते. ६० च्या दशकात राज्यात भीषण अन्नधान्य टंचाई निर्माण झाली असताना, त्यांनी आधुनिक शेती, संकरित बियाण्यांचा वापर आणि जलसंधारणाच्या योजना अत्यंत प्रभावीपणे राबवल्या. “दोन वर्षांत महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला नाही, तर मी स्वतः फासावर लटकेन,” अशी ऐतिहासिक घोषणा त्यांनी केली होती आणि ती त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारे आणि पाझर तलावांची निर्मिती करून राज्याला दुष्काळमुक्त करणारे ‘श्वेतक्रांती’चे ते खरे शिल्पकार होते.

महापौर व आयुक्तांना निवेदन देताना गोरसेना आणि बंजारा समाजाचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने नितीन किसन चव्हाण (शहराध्यक्ष, गोरसेना पिंपरी-चिंचवड), सौ. गीता नितीन चव्हाण, रावसाहेब राठोड, प्रेम पवार, आकाश चव्हाण, सचिन, रमेश राठोड, विनायक चव्हाण, शुभम खैरनार, सतीश चव्हाण, प्रतीक राठोड, रोहित चव्हाण, शुभम चव्हाण, अल्ताफ मुजावर, प्रकाश डोंगरे या सर्वांनी महापालिका प्रशासनाकडे या मागण्या तातडीने मंजूर करून बंजारा समाजाला आणि महाराष्ट्राच्या या महान सुपुत्राला योग्य तो सन्मान मिळवून देण्याची विनंती केली आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!