news
Home पिंपरी चिंचवड ह्युंदाई फाउंडेशनचे पिंपरी-चिंचवड पोलिसांना ३०० आधुनिक बॅरिकेड्स सुपूर्द; रस्ते सुरक्षेसाठी मोलाचे योगदान

ह्युंदाई फाउंडेशनचे पिंपरी-चिंचवड पोलिसांना ३०० आधुनिक बॅरिकेड्स सुपूर्द; रस्ते सुरक्षेसाठी मोलाचे योगदान

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांच्या उपस्थितीत सोहळा; आषाढी वारी आणि नाकाबंदीसाठी होणार वापर | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला ह्युंदाई मोटर इंडिया फाउंडेशनकडून ३०० वाहतूक बॅरिकेड्स भेट; रस्ते सुरक्षा आणि पालखी सोहळ्याच्या वाहतूक नियोजनाला मिळणार बळकटी!

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , ५ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते सुरक्षा अधिक चोख करण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी व गतिमान करण्याच्या उद्देशाने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून ‘ह्युंदाई मोटर इंडिया फाउंडेशन’ (HMIF) च्या वतीने ‘इझी रोड्स’ (Easy Roads) उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला (PCPC) ३०० नग ‘MS A-Type’ वाहतूक बॅरिकेड्स सुपूर्द करण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड हे राज्यातील अत्यंत वेगाने विकसित होणारे प्रमुख औद्योगिक शहर असून येथे दररोज लाखो नागरिक आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. शहरातील ही वाढती वाहतूक आणि रस्ते सुरक्षेची निकड लक्षात घेऊन ह्युंदाई मोटर इंडिया फाउंडेशनने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून हे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

ह्युंदाई फाउंडेशनकडून मिळालेले हे सर्व ३०० आधुनिक बॅरिकेड्स पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या (दिंडी सोहळा) पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या व पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हे बॅरिकेड्स अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. याशिवाय शहरातील प्रमुख आणि वर्दळीचे चौक, पोलीस नाकाबंदी, संवेदनशील ठिकाणे आणि विशेष वाहतूक नियंत्रणासाठी या बॅरिकेड्सचा वापर केला जाईल, ज्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुकर होण्यास मोठी मदत होईल.

ह्युंदाई मोटर इंडिया फाउंडेशन केवळ रस्ते सुरक्षेसाठीच नाही, तर देशभरात विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर आहे. फाउंडेशनच्या वतीने आतापर्यंत राबविण्यात आलेले काही प्रमुख उपक्रम आहेत. आयकॉनिक फॉरेस्ट’ प्रकल्पांतर्गत देशभरात १ मिलियनपेक्षा (१० लाख) जास्त वृक्षांची यशस्वी लागवड. ‘प्रोजेक्ट H2OPE’ अंतर्गत १,२०,००० पेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध. ‘प्रोजेक्ट अधिकार कनेक्ट’च्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना २९० कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या सरकारी योजनांचे लाभ मिळवून देण्यास मदत. नागरिकांना आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देणे आणि महिलांना हक्काच्या रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे.

बॅरिकेड्स हस्तांतरणाच्या या विशेष कार्यक्रमाला पोलीस प्रशासनातील आणि ह्युंदाई कंपनीचे अनेक वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते. यामध्ये मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. सारंग आव्हाड, मा. अप्पर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) श्री. बसवराज तेली आणि मा. पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) श्री. विक्रांत देशमुख, श्री. शामकुमार सिंह (Function Lead Production), श्री श्याम सिंग (Plant Head), श्री विनोद बनसोडे (Corporate Affairs Maharashtra), श्री जयेश सुळे (Corporate Affairs), श्री रेवण काकडे (CSV), श्री आदित्य इंगळे (CSR), श्री अक्षय मधुकर (CSR) आणि श्री स्वप्नील शिरसाट (CSV) हे मान्यवर उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!