news
मोशी दुर्घटनेप्रकरणी ‘अँटोनी लारा’ कंपनी आणि पर्यावरण विभागाला कारणे दाखवा नोटीस; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे कडक निर्देशपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कंत्राटी पद्धतीवर राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे यशवंतभाऊ भोसले कडाडले; मोशी दुर्घटनेवरून आंदोलनाचा इशारापुण्यात १८ जुलै रोजी इस्कॉन (ISKCON) बीसीईसी तर्फे भव्य ‘भगवान जगन्नाथ रथयात्रा’ सोहळा; बानेरमध्ये पहिल्यांदाच अवतरणार ‘पुरी’ची दिव्य परंपरामोशी येथील गुरुकुलम् व चाफेकर विद्यामंदिराच्या नुकसानीची महापौर रवि लांडगे यांच्याकडून ‘ऑन द स्पॉट’ पाहणीखडकी आणि कॅम्प परिसरात आरपीआय (ए) ख्रिश्चन सेलचा वारकऱ्यांसाठी अनोखा सेवायज्ञ; डॉर्थी आर. थॉमस आणि क्रिस्टोफर राजमणी यांच्याकडून अहोरात्र मदतकार्य
Home पिंपरी चिंचवड मोशी दुर्घटनेप्रकरणी ‘अँटोनी लारा’ कंपनी आणि पर्यावरण विभागाला कारणे दाखवा नोटीस; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे कडक निर्देश

मोशी दुर्घटनेप्रकरणी ‘अँटोनी लारा’ कंपनी आणि पर्यावरण विभागाला कारणे दाखवा नोटीस; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे कडक निर्देश

लष्कर, एनडीआरएफच्या महाबचावकार्यानंतर ९ जणांचा मृत्यू स्पष्ट; दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे मनपा आयुक्तांचे संकेत | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मोशी दुर्घटना : पालिका आयुक्त ॲक्शन मोडमध्ये! पर्यावरण विभाग आणि ‘अँटोनी लारा’ कंत्राटदार कंपनीला नोटीस बजावण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आदेश; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत चौकशीचे कठोर निर्देश

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान , १२ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण आणि दुर्दैवी दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी अत्यंत ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी आज महापालिकेतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक तातडीची आणि महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मोशी दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याप्रकरणी महापालिकेचा स्वतःचा पर्यावरण विभाग आणि प्रकल्पाचे काम पाहणारी संबंधित ठेकेदार कंपनी ‘अँटोनी लारा रिन्युएबल’ (Antony Lara Renewable) यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे कडक निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या भीषण दुर्घटनेनंतर शहरात सत्ताधारी, प्रशासन आणि कंत्राटदाराविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला असताना, आयुक्तांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे पालिका वर्तुळात आणि संबंधित कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत.

महापालिका मुख्यालयात झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सह-आयुक्त मनोज लोणकर यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आयुक्तांनी दुर्घटनेच्या कारणांचा आणि प्रशासकीय त्रुटींचा सखोल आढावा घेतला.

मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै २०२६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कचऱ्याचा महाकाय ढीग अचानक ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळला होता. या इमारतीमध्ये २२ आणि इमारतीशेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाखाली १ असे एकूण २३ नागरिक अडकले होते.

यापैकी इमारतीतून ५ नागरिक पहिल्याच दिवशी सुखरूप बाहेर पडले. उर्वरित अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय सेना (Indian Army), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे युद्धपातळीवर महाबचावकार्य राबविले. यामध्ये पहिल्या दिवशी ९ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले होते. मात्र, त्यानंतर सुरू असलेल्या शोधमोहिमेदरम्यान इमारतीत अडकलेल्या उर्वरित ९ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या संपूर्ण घटनेची अत्यंत पारदर्शक आणि सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेत इमारतीचे बांधकाम, सुरक्षेचे नियम आणि कचरा व्यवस्थापनात नेमकी कुठे हलगर्जीपणा झाला, याचा शोध घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

याचाच पहिला भाग म्हणून, प्रकल्पावर देखरेख ठेवणारा महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि प्रत्यक्ष काम करणारी ‘अँटोनी लारा रिन्युएबल’ कंपनी यांना नोटीस जारी करून तात्काळ खुलासा मागवण्यात आला आहे. या चौकशीत जो कोणी अधिकारी किंवा कंत्राटदार दोषी आढळेल, त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी बैठकीत दिले आहेत.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!