news
पिंपरी-चिंचवड मनपाची शालेय विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी योजना; ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना मोफत बसपासमोशी कचरा डेपो दुर्घटनेचे पडसाद; महासभेचे मुख्य प्रवेशद्वार रोखून विरोधकांचे महापालिकेत भव्य ठिय्या आंदोलनसोनम वांगचूक यांच्या ऐतिहासिक उपोषणाला पिंपरी-चिंचवडमधून बळ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीआरक्षणाचे उपवर्गीकरण करून स्वतंत्र न्याय मिळवून द्या; मातंग समाजाचे शासन आणि राजकीय व्यवस्थेला चिंचवडमधून आव्हानमोशी दुर्घटनेप्रकरणी केवळ निलंबन ही मलमपट्टी; कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या युतीवर नगरसेवक संदीप वाघेरे यांचा थेट हल्ला
Home पिंपरी चिंचवड मोशी दुर्घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्तांचा मोठा निर्णय; संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांचे तडकाफडकी निलंबन

मोशी दुर्घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्तांचा मोठा निर्णय; संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांचे तडकाफडकी निलंबन

पर्यवेक्षकीय हलगर्जीपणा भोवला; 'मॅक्स मंथन डेली न्यूज'च्या बातमीची दखल घेत दोषी अधिकाऱ्यांवर नागरी सेवा नियमांतर्गत चौकशीचे आदेश | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मॅक्स मंथन डेली न्यूजच्या बातमीचा दणका! मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई; मुख्य अभियंता संजय कुलकर्णी व कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट निलंबित, विभागीय चौकशीचे आदेश

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, १५ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढणाऱ्या आणि मृत कामगारांच्या न्यायासाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या ‘मॅक्स मंथन डेली न्यूज’च्या जळजळीत वृत्तमालिकेचा अखेर मोठा दणका बसला आहे. मोशी कचरा डेपो येथील भीषण दुर्घटनेत ९ निष्पाप कंत्राटी कामगारांचा बळी गेल्यानंतर, ‘मॅक्स मंथन डेली न्यूज’ने या प्रकरणात महापालिका प्रशासनाच्या पर्यवेक्षकीय अपयशावर आणि बड्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर सविस्तर प्रकाश टाकला होता. या वृत्ताची गंभीर दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आज अखेर सर्वात मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे.

या दुर्घटनेला जबाबदार धरत महापालिकेचे मुख्य अभियंता (१) संजय नारायण कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता (अ गट) योगेश आल्हाट यांना तात्काळ प्रभावाने शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या दोन्ही बड्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले असून, त्यांच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९’ अंतर्गत कठोर विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

महापालिकेने जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, मोशी कचरा डेपोवरील दैनंदिन कामकाजाचे थेट पर्यवेक्षण करणे, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कचऱ्याच्या महाकाय ढिगाऱ्यांची (SLF) प्रत्यक्ष स्थिती तपासणे आणि संपूर्ण परिसरामध्ये कडक सुरक्षिततेची अंमलबजावणी करून घेणे ही विभागप्रमुख म्हणून मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि त्यांच्या टीमची प्राथमिक जबाबदारी होती.

मात्र, ८ जुलै २०२६ रोजी दुपारी १:३० वाजता कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा एक मोठा भाग अचानक कोसळला आणि लगतच्या आरसीसी (RCC) इमारतीवर व रस्त्यावर पडला. या दुर्घटनेत तिथे काम करणाऱ्या ९ निष्पाप कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला. या गंभीर प्रकरणात संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांनी आपल्या शासकीय कर्तव्यात अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचा थेट ठपका महापालिका आयुक्तांनी ठेवला आहे.

या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांना कारणे दाखवा (Show Cause) नोटीस बजावून स्पष्टीकरण मागवले होते. त्यावर कुलकर्णी यांनी सादर केलेला लेखी खुलासा महापालिकेने अत्यंत असमाधानकारक, तथ्यहीन आणि शासकीय नियमांचे समर्थन न करणारा असल्याचे नमूद करत पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

1.सार्वजनिक सुरक्षेबाबत आवश्यक त्या कायदेशीर आणि तांत्रिक उपाययोजना करण्यात पूर्णपणे कसूर केली. 2. कचरा डेपो परिसरात नियमांचे उल्लंघन करून झालेल्या अनधिकृत बांधकामांना प्रशासकीय अभय दिल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहे. 3.कचरा प्रक्रियेदरम्यान पाळावयाच्या पर्यावरणीय नियमांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. हे निलंबन आदेशातील मुख्य गंभीर मुद्दे आहेत.

निलंबन कालावधीत संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांना नियमानुसार केवळ निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे. तसेच, त्यांचे मुख्यालय पिंपरी येथील मुख्य कार्यालय निश्चित करण्यात आले आहे. वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना हे मुख्यालय सोडता येणार नाही. याशिवाय, निलंबन काळात त्यांना इतर कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही, अशा कडक अटीही या आदेशात नमूद करण्यात आल्या आहेत.

महापालिकेने संबंधित चौकशी विभागाला या दोन्ही अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीची (Departmental Enquiry) प्रक्रिया तातडीने पूर्ण करून, नियोजित मुदतीत त्यांच्याविरुद्ध अंतिम दोषारोपपत्र दाखल करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. ‘मॅक्स मंथन डेली न्यूज’च्या बातमीमुळे प्रशासनाला झुकावे लागल्याने आणि दोषी अधिकाऱ्यांवर अखेर कारवाईचा बडगा उगारल्याने शहरातील नागरिक आणि कामगार वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!