news
थ्रिल राईड्स, ३६०° डोम अन् एआर-व्हीआर झोन; निगडीचे ‘अप्पु घर’ आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे अम्युझमेंट पार्क बनणारगुरूंचा सन्मान अन् विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप; शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर यांच्या हस्ते विशेष सोहळाद्वेष अन् ध्रुवीकरणाऐवजी तरुण पिढीला हवाय रोजगार, दर्जेदार शिक्षण आणि संविधानिक हक्क; प्रफुल्ल श्रीधर यांचे प्रतिपादनतृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पिंपरीत राज्यातील पहिले समुपदेशन केंद्र सज्ज; सावित्रीबाई फुले सभागृहात भव्य सोहळाउद्घाटनानंतर काही दिवसांतच उड्डाणपुलाची दुरवस्था; आमदार शंकर जगताप व भाजप प्रशासनावर भ्रष्टाचाराचा आरोप
Home पिंपरी चिंचवड वेतनवाढ व पदोन्नतीची प्रतीक्षा संपली; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्णयाने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

वेतनवाढ व पदोन्नतीची प्रतीक्षा संपली; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्णयाने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

१०, २० व ३० वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा; अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांची माहिती | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; १०, २० व ३० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या ७७२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘आश्वासित प्रगती योजने’चा लाभ!

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ३० जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील पात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची व दिलासादायक बातमी समोर आली आहे. महापालिकेत १०, २० आणि ३० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या पात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाअंतर्गत सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा (Assured Career Progress Scheme) लाभ देण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भातील स्वतंत्र प्रशासकीय आदेश जारी करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्तांच्या मान्यतेनंतर शासन निर्णय, पदोन्नती समितीचे निर्णय तसेच सेवाप्रवेश नियमांच्या अनुषंगाने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

या निर्णयाअंतर्गत महापालिकेतील एकूण ७७२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना तीन वेगवेगळ्या टप्प्यांत पुढील वेतनस्तराचा (पे-मॅट्रिक्स) सुधारित लाभ मिळणार आहे. पहिला लाभ (१० वर्षे सेवा)- २१६ पात्र अधिकारी व कर्मचारी, दुसरा लाभ (२० वर्षे सेवा)- ३१९ पात्र अधिकारी व कर्मचारी, तिसरा लाभ (३० वर्षे सेवा)- २३७ पात्र अधिकारी व कर्मचारी . नवीन सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम, २०२० लागू होण्यापूर्वी व त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र निकष निश्चित करण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ देताना कर्मचाऱ्यांची नियमित सेवा, पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता, विभागीय परीक्षा, गोपनीय अहवाल (CR), प्रलंबित विभागीय चौकशी, न्यायालयीन प्रकरणे व इतर सेवा अटींची काटेकोर पडताळणी करण्यात आली आहे.

“महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणे हा त्यांचा हक्क आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोबलात वाढ होण्यासोबतच प्रशासन अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल. सर्व पात्र कर्मचाऱ्यांना नियमानुसार लाभ देण्यासाठी महापालिका पूर्णपणे कटिबद्ध आहे.”

डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)

“सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जात आहे. आवश्यक कागदपत्रे, सेवा अभिलेख व प्रशासकीय पूर्तता पूर्ण होताच उर्वरित पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही तातडीने लाभ दिला जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.”

विक्रांत बगाडे, अतिरिक्त आयुक्त (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)

या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून वेतनातील पदोन्नतीची प्रतीक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेला योग्य न्याय मिळाला असून महापालिका वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!