news
‘संविधानामुळेच शेवटच्या घटकाला समान हक्क अन् अभिव्यक्ती स्वातंत्र्य’; कामगार नेते काशिनाथ नखाते यांचे प्रतिपादन!निगडीत शिक्षक दिनाचे औचित्य साधून विशेष शिक्षकांचा शानदार सत्कार; उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान!पुण्यात जमिनीच्या व्यवहारात फसवणूक; रुपाली चाकणकरांचे दीर विक्रम चाकणकर यांच्यावर नांदेड सिटी पोलिसांत गुन्हा!‘एक झाड म्हणजे भविष्यातील श्वासाची हमी’; जांबवडे येथे ‘वनश्री’ पुरस्कारप्राप्त अरुण पवार यांचे नागरिकांना आवाहन!‘सरकारी नोकरीच्या खोट्या आमिषांना बळी पडू नका’; पिंपरी-चिंचवड पोलिसांचे नागरिकांना आवाहन, भामट्यावर गुन्हा दाखल!
Home पिंपरी चिंचवड ऑल इंडिया रँक ४९८ पटकावणाऱ्या अतुल्या डोंगरेचा महापालिकेत सत्कार; महापौरांनी दिल्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा

ऑल इंडिया रँक ४९८ पटकावणाऱ्या अतुल्या डोंगरेचा महापालिकेत सत्कार; महापौरांनी दिल्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा

कठोर परिश्रम अन् आत्मविश्वासाच्या जोरावर मिळवले यश; पिंपरी पालिकेत पार पडला गौरव सोहळा | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

NEET 2026 मध्ये देशात ४९८ वा क्रमांक मिळवणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या कन्या अतुल्या डोंगरे हिचा महापौरांकडून विशेष गौरव!

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ३० जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहराची सुकन्या कु. अतुल्या डोंगरे हिने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेत (NEET 2026) अखिल भारतीय स्तरावर ४९८ वा क्रमांक (AIR 498) पटकावत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते तिचा पालिकेत विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महापौरांनी तिला पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह प्रदान करून पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सत्काराप्रसंगी बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले, “कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे अतुल्या डोंगरे हिने सिद्ध करून दाखवले आहे. तिचे हे यश केवळ तिच्या कुटुंबाचे नसून संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरासाठी अभिमानाची बाब आहे. तिच्या यशातून शहरातील हजारो विद्यार्थी प्रेरणा घेतील, असा मला विश्वास वाटतो.” महापौरांनी पुढे सांगितले की, शहरातील अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका नेहमीच कटिबद्ध राहील.

आपल्या यशाबद्दल मनोगत व्यक्त करताना कु. अतुल्या डोंगरे हिने या यशाचे श्रेय आपले आई-वडील, शिक्षक आणि कुटुंबीयांच्या भक्कम पाठिंब्याला दिले. “सातत्याने केलेला अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन आणि स्वतःवर ठेवलेला आत्मविश्वास यामुळे हे यश संपादन करता आले,” असे तिने नमूद केले. तसेच, विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत हार न मानता आपल्या ध्येयासाठी प्रयत्न करत राहावेत, असा संदेशही तिने इतर विद्यार्थ्यांना दिला.

या सत्कार सोहळ्याला सतीश शिंदे, संदेश काटे पाटील, मॅक्स मंथन डेली न्यूजचे विशाल जाधव यांच्यासह अनेक मान्यवर आणि पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी अतुल्या हिचे अभिनंदन करत तिच्या भावी वैद्यकीय कारकिर्दीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!