news
थ्रिल राईड्स, ३६०° डोम अन् एआर-व्हीआर झोन; निगडीचे ‘अप्पु घर’ आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे अम्युझमेंट पार्क बनणारगुरूंचा सन्मान अन् विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप; शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर यांच्या हस्ते विशेष सोहळाद्वेष अन् ध्रुवीकरणाऐवजी तरुण पिढीला हवाय रोजगार, दर्जेदार शिक्षण आणि संविधानिक हक्क; प्रफुल्ल श्रीधर यांचे प्रतिपादनतृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पिंपरीत राज्यातील पहिले समुपदेशन केंद्र सज्ज; सावित्रीबाई फुले सभागृहात भव्य सोहळाउद्घाटनानंतर काही दिवसांतच उड्डाणपुलाची दुरवस्था; आमदार शंकर जगताप व भाजप प्रशासनावर भ्रष्टाचाराचा आरोप
Home पिंपरी चिंचवड माजी नगरसदस्य कै. सोपानराव भोईर यांच्या स्मरणार्थ कॅरम स्पर्धेचा थरार; ३.५६ लाखांची बक्षिसे अन् ४०० खेळाडूंचा सहभाग

माजी नगरसदस्य कै. सोपानराव भोईर यांच्या स्मरणार्थ कॅरम स्पर्धेचा थरार; ३.५६ लाखांची बक्षिसे अन् ४०० खेळाडूंचा सहभाग

उपमहापौर शर्मिला बाबर व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची उपस्थिती; २९ ते ३१ जुलैदरम्यान रंगणार सामने | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते १९ व्या महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ!

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ३० जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग, कॅरम असोसिएशन ऑफ पुणे आणि नवरात्र मित्र मंडळ (इंद्रायणीनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ व्या महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा २०२५-२६ चा दिमाखदार शुभारंभ पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. ही स्पर्धा माजी नगरसदस्य कै. सोपानराव भोईर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली आहे.

चिंचवड येथील कै. मनिषा भोईर विरंगुळा केंद्र (प्रेमलोक पार्क, सावरकर उद्यानाशेजारी) येथे ही स्पर्धा २९ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत रंगणार आहे. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ४०० हून अधिक कॅरमपटू सहभागी झाले आहेत.

कॅरमसारख्या एकाग्रतेची कसोटी पाहणाऱ्या खेळाला प्रोत्साहन देणे आणि नवोदित खेळाडूंना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेतील विविध गटांतील विजेत्या खेळाडूंना एकूण ₹३.५६ लाखांची रोख पारितोषिके आणि आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याला उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा विभागाचे उपआयुक्त पंकज पाटील यांच्यासह जिल्हाभरातील खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“कॅरम हा केवळ मनोरंजनाचा खेळ नसून एकाग्रता, संयम, अचूकता आणि निर्णयक्षमता विकसित करणारा खेळ आहे. महापौर चषक कॅरम स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची मोठी संधी उपलब्ध होत आहे. सर्व स्पर्धकांनी क्रीडाभावना जपत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करावे, या शुभेच्छा.”

रवि लांडगे, महापौर (पिंपरी-चिंचवड महापालिका)

“कै. सोपानराव भोईर यांच्या स्मृती जपणारी ही स्पर्धा त्यांच्या क्रीडाप्रेमाचा वारसा पुढे नेणारी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील गुणवंत खेळाडूंना समान संधी मिळत असून, येथून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील असा विश्वास आहे.”

भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते (पिंपरी-चिंचवड महापालिका)

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!